Thursday, 3 August 2017

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून

पुणे,दि.2 -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या (पीपीपी) माध्यमातून उभारला जाणार असून यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये तीन कंपन्या पात्र ठरल्या असून डिसेंबर अखेर पर्यंत त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

पीएमआरडीए करणार मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मेट्रो स्टेशनचे ब्रँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी, हिंजवडीच्या औद्योगिक परिसरासह विविध कंपन्यांना स्टेशनचे पालकत्व ...

पिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय?

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यासाठी निकष तपासण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील ...

पिंपरी पालिकेत लाचखोरीची 'परंपरा' २० वर्षांपासून कायम

पिंपरी पालिकेत लाचखोरीची परंपरा २० वर्षांपासून कायम आहे. १९९७ पासून आतापर्यंत २१ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आले आहेत. १०० रुपयांपासून ते १२ लाख रुपयांपर्यंतची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

राखी पाठविण्यासाठी 'मेलबॉक्स'

या धावपळीत आपल्या जीवलगांची भेट होत नाही. अशा वेळी पोस्टाने राखी पाठवण्यासाठी सध्या लगबग दिसून येत आहे. शहरातील पिंपरीचिंचवडआकुर्डी, मासूळकर कॉलनी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरी येथील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी ...

[Video] रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अनोखा उपक्रम

पिंपरी-चिंचवड परिसरातील दवाखाने व मातांना भेट देत रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या वतीने मातांमध्ये जनजागृती व स्तनपान शिबिर आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर 1 ते 7 ऑगस्ट हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदींनी सहभाग घेतला व शहरातील दवाखान्यांना भेटी दिल्या जाणार आहेत.या शिबीराची सप्ताहाची सुरुवात आज पिंपरीच्या डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालयातून करण्यात आली.यावेळी मातांना डिकांच्या लाडूचे वाटप करण्यात आले.

Wednesday, 2 August 2017

‘ग्रेडसेपरेटर’मध्ये वाहतूक कोंडी

ट्रक बंद पडल्याने खोळंबा : वाहन चालकांना मनःस्ताप
पिंपरी – मेट्रोसाठी शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिलर उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, खराळवाडीत ग्रेडसेपरेटरमध्ये अचानक ट्रक बंद पडल्याने महामर्गावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली यामुळे वाहन चालक व प्रवाशांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागला.