Saturday, 5 August 2017

बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. शहरासह लगतच्या भागातील नागरिकदेखील येथे खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे कॅम्पातील शगुन चौक, साई चौक, कराची चौक ...

अडीचशे जणांवर पालिकेची कारवाई

महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेल्टर असोसिएट्स व पिंपरी-चिंचवडमहानगरपालिका क क्षेत्रीय आरोग्य विभागामार्फत संयुक्तरीत्या गुरुवारी बालाजीनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली.

घरासाठीच्या आंदोलनाची पन्नाशी

पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी 'घर बचाव संघर्ष समिती'ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस ...

वाहतूक नियमांच्या पालनासाठी पोलिसांचे 'रक्षाबंधन'

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण जास्त आहे. नियम मोडल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपक्रम राबविण्यात यावा, अशी संकल्पना पोलीस ...

Friday, 4 August 2017

ग्रेडसपरेटर, उड्डाणपुलासाठी ‘मेट्रो’ची परवानगी घ्या - अमोल थोरात

एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून ‘मेट्रो’, राज्य शासन आदींकडून नवीन आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. ‘मेट्रो’ने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
ग्रेडसपरेटर, उड्डाणपुलासाठी ‘मेट्रो’ची परवानगी घ्या - अमोल थोरात

“भक्‍ती-शक्‍ती’ उड्डाणपूल चुकीचा?

अमोल थोरात यांचा आरोप : कामाला स्थगिती देण्याची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – भक्‍ती-शक्‍ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार केलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून त्याला मेट्रो व राज्य शासनाची मंजुरी घेण्यात यावी. मेट्रोने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

मेट्रोच्या आराखड्यानुसार कामे करण्याची मागणी

पिंपरी : भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही.