MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 29 August 2017
महापालिका गणेश फेस्टिव्हल : महोत्सवावरून रूसवे फुगवे
पिंपरी : महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे. 'पिंपरी-चिंचवड ...
पिंपरी शहरात प्रथमच जीएसबी गणेशोत्सव
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रंगास्वामी पेरूमल सभागृहात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जीएसबी समाज कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत वसलेला समाज असून, त्यामध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या समाजात विविध ...
जलपर्णीच्या नावाखाली ठेकेदारावर मेहेरनजर?
एकाच कंपनीला ठेका : सुमारे 40 लाखांचा खर्च
पिंपरी – पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळा संपल्यानंतर जलपर्णी झपाट्याने वाढून नदी पात्रात जलपर्णीचा विळखा वाढत असतो. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने सन 2017-18 या एका वर्षांची वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवून कामांचा ठेका एकाच कंपनीला दिला आहे. यावर सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार आहे.
ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी 31 ऑगस्टपर्यंतची “डेडलाईन’
चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू असून, 20 टक्के कामे अद्याप शिल्लक राहिली आहे. ही कामे 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
वाकड रस्ता चौकात पथदिव्यांची मागणी
चौफेर न्यूज – वाकड रस्ता चौकात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण संघटनचे शहराध्यक्ष अविनाश रानवडे यांनी ग क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.
Monday, 28 August 2017
टीम PCCF तर्फे घरकुल, चिखली येथे शून्य कचरा विषयावर प्रबोधन
Waste Composting Awareness session by Team PCCF at Gharkul Housing Society, Chikhali. Session to enlight & encourage citizen on home composting. अतिशय वेगळ्या पद्धतीने घरकुल, सेक्टर 17-19 चिखली येथील साई हौसिंग सोसायटीने त्यांचा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून बाबासाहेब काळे, समन्वयक पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम यांनी शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांचे शंकानिरसन, प्रात्यक्षिक यातून प्रबोधन केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. नितिन यादव (संस्थापक अध्यक्ष अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य) जागृत नागरिक महासंघ पुणे, विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी या प्रसंगी सोसायटीच्या नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले


Subscribe to:
Posts (Atom)