चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे हे तलाव सेवाशुल्कावर चालवायला देण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याकरिता लवकरच नवीन धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 31 August 2017
स्वच्छतेच्या गुणवत्तेसाठी महापालिकेचा स्वतंत्र आराखडा
चौफेर न्यूज – केंद्र सरकारची स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम 4 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे. या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. यामध्ये 1 सप्टेंबरपासून दर शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या कालावधीत दोन तासाचे श्रमदान करून वॉर्ड व परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहे. दर पंधरा दिवसांनी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.
जून्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेपरेटर बनविणार
चौफेर न्यूज – जून्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते खडकी सिग्नलपर्यंत वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी दोन्ही मनपाकडून नदीवर नव्याने हरिश ब्रीजला समातंर पुल बांधण्यात येत आहे. तसेच, रस्त्यावरील घराचे अतिक्रमण तत्काळ हटवून ग्रेडसेपरेटर बनविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीष बापट यांनी पुणे मनपाचे आयुक्त कुणालकुमार यांना दिल्या.
शहरातील मनपा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सक्षम करा – आमदार जगताप
चौफेर न्यूज – शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर मनपा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सक्षम करावा, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या. आज सकाळी शहरातील विविध विकास कामांबाबत तसेच स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाबाबत अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते.
Ganesh Utsav Celebration 2017 : घरगुती गणपती देखाव्यातून दिला दुष्काळ मुक्तीचा संदेश
पिंपरी चिंचवड भागात राज्यभरातील दुष्काळी भागातील लोक मोठ्या संख्येने उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. यापैकी बरीचशी मंडळी भागवत कुटुंबीयांचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवतात. याच दुष्काळग्रस्त जनतेला पाणी ...
Wednesday, 30 August 2017
दापोडी ते खडकी हॅरिस ब्रिजजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली पाहणी
पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दापोडी येथे हॅरिस ब्रिजजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीची मंगळवारी (दि. २९) पाहणी केली.
त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
त्यात दापोडी ते खडकीपर्यंत होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या भागात उड्डाणपूल की भुयारी मार्ग उभारता येईल, यावर चर्चा करण्यात आली. त्याबाबत संयुक्तिक अभ्यास करून आठवडाभरात अहवाल देण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
Nitin Gadkari’s call for shift to e-transport: PMPML to start ‘planning’, activists call for transit oriented system
PMPML Chairman and Managing Director said, “We do have a plan to run e-buses, but, since electric buses are not plying anywhere in the country, we will have to rope in the buses and plan accordingly.
Subscribe to:
Posts (Atom)