Friday, 1 September 2017

PCMC's dog pound sounds death knell for rescued animals

Four-year-old Babu was sent to the dog pound under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) by residents of the twin towns after he met with a road accident and suffered a spinal injury on August 22. A week after the occurrence, when the ...

13 new railway bridges to be built in Pune district

13 new railway bridges to be built in Pune district

मीडिया सेलसाठीच्या उधळपट्टीस विरोध

पिंपरी - शहराची प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेसाठी नागपूरच्या धर्तीवर खासगी तत्त्वावर सोशल मीडिया कक्ष स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी तीन वर्षांकरिता सुमारे ७५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याला माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला आहे. 

महिला प्रवाशांसाठी दोन महिन्यांत ‘स्पेशल बस’

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी महिलांसाठी ‘स्पेशल बस’ सेवा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ३०-४० बसची खरेदी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

‘मेट्रो’ रक्तपेढीची जिल्हा रुग्णालयाला प्रतीक्षाच

पिंपरी - पुणे जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्रात मानबिंदू ठरू पाहणाऱ्या औंध येथील जिल्हा रुग्णालय अद्यापही मेट्रो रक्तपेढीच्या (मेट्रो ब्लड बॅंक) प्रतीक्षेतच आहे. या वर्षी तरी आमची प्रतीक्षा संपणार का? असा सवाल रुग्णालयीन अधिकारी विचारत आहेत. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वेळकाढू, सुस्त कारभारामुळेच रक्तपेढीची प्रतीक्षा लांबली आहे. परिणामी, जिल्ह्यातील लाखो गरीब व गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याची खंतही रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

पिंपरी चिंचवड : गांधीनगरमध्ये गुंडगिरीचा धुडगूस, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

पिंपरी चिंचवड, दि. 31 - ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनाजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे 'दादा' आहोत, कोणी ...

साई चौकातील भुयारी मार्ग दुरुस्त करण्याची एमआयएमची मागणी

पिंपरीतील साई चौक येथील रेल्वे लाईन खालील कै. किमतराव आसवानी भुयारी मार्गाची दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या भुयारी मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाचे शहर प्रवक्ता धम्मराज साळवे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.