Sunday, 15 October 2017

PCMC drainage proposal gets state approval

Pimpri Chinchwad: The state government has approved the drainage plan put forth by Pimpri Chinchwad Municipal Corporation.The plan will cost of Rs 148 crore and will be funded by the Atal Mission For Rejuvenation and Urban Transformation (Amrut) ...

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भुमिपूजन

चौफेर न्यूज – मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.

बांधकाम नियमितीकरणासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कक्ष

– महापौरांची आयुक्‍तांना सूचना
पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांचे अर्ज स्विकारण्यासाठी महापालिका मुख्य इमारतीत कक्ष स्थापन करण्यात आला. परंतु, यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ होणार आहे. यामुळे नागरिकांची सोय व्हावी, याकरिता आठही क्षेत्रीय कार्यालयात कक्ष सुरू करावेत, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

मोशीत रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध; महापालिकेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

पिंपरी : महापालिकेच्यावतीने आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन ...

आढळराव पाटील अन् बारणे भाजपात जाणार हे तर भाजप ‘अफवा ब्रिगेड’चे काम

पिंपरी (प्रतिनिधी):- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे भाजपात जाणार असं पसरविणे भाजपच्या ‘अफवा ब्रिगेड’चे काम आहे. जाणीवपूर्वक भाजपातील काहीजण ही पसरवत अाहेत. हे दोन्ही खासदार कुठेही जाणार नाहीत असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत फटका स्टॉल विरोधात महावितरणची पोलिसांकडे तक्रार

पिंपरी - डीलक्‍स चौकात उभारण्यात आलेल्या अनधिकृत फटाका स्टॉलच्या कामात महावितरणची मुख्य 22 केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे तब्बल चार हजार ग्राहकांचा सुमारे अकरा तास वीजपुरवठा खंडित झाला. तर महावितरणचे एक लाख 35 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 

Saturday, 14 October 2017

पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली स्वीडनच्या काऊंसिल जनरल कॅम्पबेल वेल्टलिंड यांच्या शिष्टमंडळाने भेट

स्वीडनचे काऊंसिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस भेट दिली.
शहराचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हार्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडविक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनील पवार या वेळी उपस्थित होते.