पिंपरी – भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 7 November 2017
पालिका बांधणार पवनेवर बंधारा
पिंपरी – पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनीचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनूसार पिंपरी महापालिका शिवणे, गहूंजे गावासाठी पवना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधून देणार आहे. याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पीएमपीच्या 1550 बस अन् 2400 ब्रेकडाउन !
पुणे - पीएमपीच्या ताफ्यातील 2000 बसपैकी सुमारे 1550 बस दररोज मार्गांवर धावतात. मात्र, दरमहा ब्रेकडाउनच्या किमान 2400 घटना घडत आहेत. जुन्या बसची वाढत असलेली संख्या आणि वाहतूक कोंडी, यामुळेही ब्रेकडाउनची संख्या वाढत आहे.
भाजपाची ‘प्रतिमा’ डागाळली; १० वर्षातील भांडार विभागाच्या कामकाजाची चौकशी करा…!
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीमुळे सत्ताधारी भाजपाची जनमानसातील ‘प्रतिमा’ डागाळत आहे. महापालिकेच्या भांडार विभागाच्या दहा वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्यात यावी;. या विभागातर्फे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया, खरेदी आणि प्रत्येक आर्थिक व्यवहाराचीही सखोल चौकशी करून यातील दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
“बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा
– प्राधिकरण हद्दीतील घरे अधिकृत करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा स्वभिमानीच्या समन्वयकांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सभापतिपदासाठी चुरस, वर्णी लागण्यासाठी नेत्यांना साकडे
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन शिक्षण समिती लवकरच स्थापन होणार आहे. या समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर नववर्षात शिक्षण समितीचे ...
मुलांकडून भीक मागण्यांचा धंदा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात बेवारस आणि भिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या चौकांत सिग्नलवर अनेक भिकारी किंवा व्यंगाचे सोंग घेऊन वस्तू विकणारी बहुतांश मुले दिसतात. त्यामुळे मुलांकडून भीक मागणे हा धंदा झाल्याने वाहन चालकांना त्यांचा त्रास होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)