Saturday, 18 November 2017

Bopkhel residents to meet top officials

Pimpri Chinchwad: The residents of Bopkhel will meet district collector and municipal commissioner to seek clarity on the construction of an alternate road to their village.

Treasure hunt, informal get-together to drive home message of recycling

Pune: A treasure hunt at a waste-sorting facility, a meet-and-greet over an eco-conscious beer-and-snacks session. This is how a company engaged in the social sector plans to drive home the necessity of recycling waste.

शहरातील शाळा-कॉलेज, हॉस्पिटलच्या बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा-कॉलेज तसेच हॉस्पिटलच्या बाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबत शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांना निवेदन दिले.

भोसरीतील १०० कोटींचा पूल कचऱ्यात!

कोटीच्या कोटी उड्डाणे घेत तब्बल १०० कोटीच्या घरात पोहचलेला भोसरीत उड्डाणपूल आता चक्क कचऱ्यात गेल्याचे चित्र आहे. १०० कोटींच्या या पुलाबद्‌दल कित्येक रंजक स्वप्ने नागरिकांनी दाखविण्यात आली होती. पुलाखाली उद्यान, पे अँण्ड पार्क होणार, यामुळे या परिसराचा कायापालट होणार अशा बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. परंतु हे सर्व काही कागदावरच राहिले असून नियोजना अभावी या पुलाखाली अक्षरशः कचराकुंडी निर्माण झाली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर जाणार स्वीडन दौ-यावर

महापौर नितीन काळजे आणखी स्पेन दौ-यावर गेलेले असताना आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर विदेशवारीवर स्वीडन दौ-यावर जाणार आहेत. ते येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) या दौ-यावर रवाना होणार आहेत. त्यांच्यानंतर महापालिका आयुक्तांचा कारभार कोण बघणार, याची उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवडला ज्यादा पाणी देण्यास जलसंपदा मंत्री तयार

पिंपरी-चिंचवड शहराला जास्तीचे पाणी देण्यास मुंबईतील कालावा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. ठरवून दिलेल्या पाणी आरक्षणापेक्षा अधिक पाणी पवना धरणातून घेण्यास राज्य शासनाने तयारी दर्शविल्याने शहराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे

पिंपरी – हातगाडी किंवा टपरीधारक अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी व्यक्त केला.