चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका क्षेत्रातील पेट्रोलपंपांवर असले;ली स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्याचा आदेश नुकताच काढला असून पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने याला हरकत घेतली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 20 December 2017
अग्नीशमन विभागाचा सावळा गोंधळ
पिंपरी – महापालिकेच्या अग्नीशमन सेवेसाठी लागणारे साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेव्दारे करण्यात आली. परंतु, ही साहित्य खरेदी करताना अग्नीशमन सेवेच्या संचालक यांची तांत्रिक मंजुरी घेतली नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे महापालिका अग्नीशमन अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शहरबात पिंपरी-चिंचवड : भाजप-शिवसेनेत वर्चस्वाची कुरघोडी
पिंपरी महापालिकेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’ येणे अपेक्षित असताना, भाजप-शिवसेनेतच कलगीतुरा रंगलेला आहे. नऊ महिन्यांपूर्वीच्या पालिका निवडणुकांचे संघर्षांचे वातावरण अद्याप निवळले नाही. भाजप-शिवसेनेत आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही विधानसभा आणि मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर, त्या ठिकाणी आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेची लढाई आहे. यामुळेच निवडणुकांचे पडघम सुरू होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वाची कुरघोडी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शिवसेने’च्या मदतीला धावून आली ‘मनसे’
सतत एकमेकांविरोधात टीका टिपण्णी करणाऱ्या शिवसेना-मनसे नेत्यांच्या भुमिका असताना. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या मदतीला धावून आली. यासाठी निमित्त ठरले एक संगणक.

Sena leader wants PCMC chief transferred over 'corruption'
Maruti Bhapkar has written to the CM, alleging dubious decisions made; while NCP supports him, BJP has scoffed
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems to forever have trouble with its commissioners. With Shrikar Pardeshi, demands for a transfer occurred because he was deemed far too upright and outspoken. Now, similar requests are being made to transfer current chief Shravan Hardikar over allegations of corruption.
कॉनक्वेस्टच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत भरारी
पिंपरी– चिखलीतील महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या कॉनक्वेस्ट महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहल आचार्य हिने कंपाउंड राऊंड 50 मीटर आर्चेरी (धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम तर विभागात चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या यशामुळे तिची ऑल इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी
चौफेर न्यूज – बोपखेल परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात गुन्हेगारीही त्याचप्रमाणात वाढत असून बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी माय माऊली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश तेजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदींना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोपखेलची सद्यस्थितीत 25 ते 30 हजार लोकसंख्या असून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय आदी नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु, बोपखेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. पोलीसात तक्रार देण्यासाठी नागरिकांना भोसरी येथील पोलीस ठाण्यात 10 ते 15 किलो मीटरचा वळसा मारून यावे लागते. त्यामुळे अनेक नागरिक तक्रार देण्याचे टाळतात. तथापि, बोपखेलसाठी त्वरीत स्वंतत्र पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी माय माऊली प्रतिष्ठानचे रूपेश तेजी, रामदास गोसावी, स्वप्निल मेदगे आदींनी केली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)