Saturday, 23 December 2017

पारदर्शकतेसाठी नवे धोरण

शहरात ठिकठिकाणी बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकची कामे बंद करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी मागे घेतला. परंतु, या कामातील पारदर्शकतेसाठी नवे धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता बायोमेट्रिक हजेरी

ज्युनिअर कॉलेजांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबईसह राज्यातील खासगी क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांचे सुरू असलेले साटेलोटे सुंपष्टात आणण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी नागपूरात हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या अनधिकृत शिकवणीला चाप बसेल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

निगडीपर्यंत मेट्रो करा; खासदार बारणे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

स्वारगेट ते पिंपरीऐवजी निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो प्रकल्प आवश्यक आला. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी, तसेच आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे केली आहे.

भामा आसखेडचे पाणी मिळणार केव्हा?

पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून सुमारे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. पुण्याचा प्रकल्प मोठ्या वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिका लवकरच काम हाती घेणार आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नसल्याने, त्यांनी आंदोलन करून त्यांच्या गावातून जाणाऱ्या जलवाहिनीचे काम थांबविले आहे.

आकुर्डीत सोमवारी कुस्त्यांचा आखाडा

पिंपरी – खंडोबा उत्सवानिमित्त खंडोबा देवस्थान व आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने येत्या सोमवारी (दि. 25) इनामी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. आकुर्डीतील वसंतदादा पाटील शाळेच्या मैदानावर दुपारी अडीच वाजता हा कुस्त्यांचा फड रंगणार आहे.

Nigdi-Dapodi BRTS service trial run to start next week

Pimpri Chinchwad: The trial run of PMPML buses on the 12-km stretch of the Nigdi-Dapodi BRTS
corridor on the Mumbai-Pune highway will start next week, but the bus operation on the route will start only after IIT Bombay submits the road safety audit report.

PCMC to develop new roads and gardens in fringe areas

Pimpri Chinchwad: After Charholi and Dighi, development works will be carried out in Chikhali, Rupinagar and Talawade IT Park, falling on the outskirts of Pimpri Chinchwad.