Thursday, 28 December 2017

दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान

– पशुप्रेमी मच्छिंद्र तापकीर यांची सतर्कता
पिंपरी – काळेवाडी-तापकीरनगर मधील पशूप्रेमी तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान मिळाले.

“लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’चा उच्छाद

पिंपरी – मागील भागात पुणे-बंगळूरू द्रूतगती महामार्गावर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटची माहिती घेतली. मात्र, शहराच्या विविध भागांत “लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’ ला उधाण आल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांमध्ये खुणावणारे “लॉज’चे बोर्ड दिसले की याठिकाणी लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट सक्रीय असल्याचे समजण्यास हरकत नाही, एवढी परिस्थिती बिकट झाली आहे.

[Video आरबीआयचा पिंपरीतील एचडीएफसी बँकेला दणका…!

पिंपरी (Pclive7.com):- नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे इंगळूण येथील आदिमाया माध्यामिक शाळेला ई लर्निंग संच भेट

जुन्नर तालुक्यातील इंगळूण या दुर्गम व आदिवासी पाड्यावरील आदिमाया माध्यामिक शाळेला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांनी रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ यांच्या सहाय्याने नुकताच एक ई लर्निंग संच भेट दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट रो. विलास गावडे, रो. सतीश आचार्य, रो. वैजयंती आचार्य, रो. वसुधा गावडे,  महेश ढोले, शाळेचे मुख्याध्यापक मारुती ढोबळे, शाळेचे इनामदार सर व विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरीत बनावट शॅम्पू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी ब्रँडेड शॅम्पू वापरत असाल तर सावधान...पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट ब्रँडेड शॅम्पू बनविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भंगारातून जमा केलेल्या बाटलीत केमिकल टाकून शॅम्पू विकणाऱ्या या टोळीतील चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी डव्ह, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल आदी नामवंत कंपनीचे बनावट शॅम्पू जप्त केले आहेत.

हलगीच्या गजरात खंडोबाची पालखी मिरवणूक

निगडी – आकुर्डी येथील खंडोरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. खंडेरायास अभिषेक करण्यात आला. वाजंत्री व हलगी पथक तसेच ढोल ताशा या वाद्यांच्या गजरात श्रींच्या काठीची व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली.

Wednesday, 27 December 2017

वाकड रोड “पोस्टरमुक्‍त’

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सबाजी करुन परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या “पोस्टर’बाजांना भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी चांगलाच दणका दिला आहे. वाकड रोड परिसरातील बेकायदा पोस्टर स्वत: यंत्रणा राबवून मंगळवारी हटवण्यात आले. त्यामुळे अनधिकृत पोस्टर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.