पिंपरी – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तक रुपाने मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथालयांनी अर्ज करावेत, असे आवाहन सावरकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 31 December 2017
विलीन झालेल्या बॅंकांचे चेकबुक होणार बाद
नव्या आयएफएससी कोडसह मिळणार नवे चेकबुक
नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बॅंकांचे चेकबुक 31 डिसेंबर 2017 पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक 31 डिसेंबरनंतर चालणार नाहीत. विलीनीकरणानंतर या बॅंकांचा आयएफएससी कोड बदलला आहे. त्यामुळे नव्या आयएफसी कोडसह नवीन चेकबुक घेणे ग्राहकांना बंधनकारक आहे.
कोट्यावधींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप शहराध्यक्षांचा कांगावा – संजोग वाघेरे
महिला सक्षमीकरणाच्या व्यासपीठाला खोडा घालण्याचा डाव
चौफेर न्यूज – एकीकडे कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेत 35-40 लाख बचत करण्याचा आव आणायचा प्रकार भाजप शहराध्यक्षांनी केला आहे.पुर्वी पवनाथडी जत्रा स्वतःच्या कार्यक्षेत्रात घेण्यासाठी आटापिटा करीत होते.मात्र आता भाजप मध्ये गेल्यानंतर महिला सक्षमीकरणात येणाऱ्या खर्चात बचत होत असल्याचा साक्षात्कार झाला आहे, असा आरोप पिंपरी- चिंचवडचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. याबाबत वाघेरे यांनी निवेदन जाहीर केले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक – रमेश सरदेसाई
चौफेर न्यूज – प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता तळीरामांवर कारवाईकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापासूनच “ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’ ची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी घेतले कमांडो प्रशिक्षण
पिंपरी – इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड व कमांड स्पेशल फोर्स औंध यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कमांडो प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात झाला. शिबिरात एकूण 180 विद्यार्थी सहभागी झाले, त्यामध्ये 120 मुलींचा सहभाग होता.
महापालिकेच्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा
पिंपरी – कासारवाडी नदीपात्रालगतच स्मशानभूमीला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छतागृहात गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पडीक पडलेल्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा भरत आहे. परिसरातही हॉटेल, गॅरेज तसेच दुकाने असल्याने या परिसरात सायंकाळच्यावेळी फिरणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)