Tuesday, 23 January 2018

परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

पुणे - ""जाहिरातींद्वारे स्वस्त घरांबद्दल दिलेल्या माहितीवर लोकांचा विश्‍वास बसणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधूनच हा विश्‍वास संपादन केला जाऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि घरांची गरज लक्षात घेऊन "पंतप्रधान आवास योजने'द्वारे परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न "पीएमआरडीए'च्या माध्यमातून सरकारकडून केले जात आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

म्हाळुंगे टीपी स्कीमचा ड्राफ्ट महिनाभरात

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे -माण येथे सुमारे 719 एकरवर नगर रचना योजना (टीपी स्कीम ) जाहीर केली आहे. या टीपी स्कीमचा ड्राफ्ट येत्या महिनाभरात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला ‘सावकारी धंदा’ महापालिकेने बंद करावा – श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनाधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर काय माफ होऊ शकला नाही. महापालिका करसंकलन विभागाने नागरीकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लाऊन नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही तर मिळकती जप्त करण्यात येतील अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. चक्रवाढ व्याज लाऊन नोटीसा देणे बंद करावे. तसेच शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये १०० टक्के पाणीपट्टी वाढ प्रस्तावित

मागील दहा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील पाणीपट्टी वाढविण्यात येणार आहे.  महापालिका प्रशासनाने थेट १०० टक्के पाणीपट्टी वाढ पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रस्तावित केली आहे. यापूर्वी २०० लीटर पाण्यासाठी अडीच रुपये मोजावे लागत होते, परंतु ही वाढ झाल्यानंतर शहरवासीयांना २०० लीटर पाण्यासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हॉट्सअॅप बिझनेस या दिवशी होणार लॉन्च….

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपकडून भारतातील यूजर्सना लवकरच नवीन गिफ्ट मिळणार आहे. कारण, गेल्याच आठवड्यात व्हॉट्सअॅपने जगभरातील अनेक देशांमध्ये आपले नवे ‘बिझनेस अॅप’ लॉन्च केले होते. पण आता हे अॅप लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे.

‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीच्या उत्पादनांची विक्री

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलीला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आले आहे.

रस्त्यावर धावणार ‘भगवी मॅजिक’!

रिक्षा संघटनेचा विरोध : परिवहन मंत्र्यांचा आणखी एक वादग्रस्त निर्णय
पुणे – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये धोरणात्मक बदल करण्यास लावून सहा आसनी रिक्षा स्क्रॅप करुन त्याबदल्यात टाटा मॅजिक हे वाहन बदली वाहन म्हणून रजिस्टर करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, याचा रंगही भगवा असणार असल्याचे समजते. पुण्यातील रिक्षा संघटनेने मात्र याला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि परिवहन कार्यालयाकडे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.