भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना देखील लांडगे यांनी केल्या.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 12 February 2018
वाकडमधील अडीच किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून उभारण्याचे नियोजन – नगरसेवक संदिप कस्पटे
हिंजवडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याबरोबरच महत्त्वाचे मार्गही सक्षम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यानुसार वाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु, एवढा मोठा उड्डाणपूल उभारण्याचा खर्च महापालिकेला पेलवणारा नाही. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारने करावा यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामार्फत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पोलिस ठाण्यात तक्रार देताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन फसवणूक, रस्त्यावर लुबाडल्यानंतर पोलिसांची मदत कशी घ्यावी, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतात. या संदर्भात नागरिकांकडून ‘सकाळ’ने प्रश्न मागविले होते. या प्रश्नांना पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिलेली उत्तरे.
‘नायलॉन’ मांजावर बंदीसाठी लोकशिक्षणासह जनजागृती हवी
पशुपक्ष्यांसह मानवी जीवनाला घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोऱ्यांपासून बनवलेला ‘मांजा’ उत्पादन, साठा, विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे. तरीही पतंगासाठी नायलॉन, गट्टू आणि तंगुस मांजा या सांकेतिक नावाने ‘चायनीज’ व भारतीय बनावटीचा मांजा सर्रास विकला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घातक मांजा न वापरण्याबद्दल माहिती देणे, सामूहिक प्रतिज्ञेचा उपक्रम राबविला पाहिजे. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा असली तरी भारतीय दोऱ्याचा वापर करावा. याबाबत डॉ. कल्याण गंगवाल यांच्याशी यशपाल सोनकांबळे यांनी साधलेला संवाद...
टांझानियातील किलीमांजरो पर्वतावर शिवजयंती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सह्याद्रीचे मावळे अनिल वाघ, क्षितीज भावसार आणि रवी जांभूळकर हे युवक. 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो या पर्वतावर साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाणार आहे.
Shiv Sena MP threatens to approach PMO regarding irregularities in PCMC tendering process
The ruling Bharatiya Janata Party (BJP) at Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been facing flak from the opposition parties for its tendering processes. The latest criticism has come from Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil who threatened to approach the Prime Minister’ss Office (PMO) and Enforcement Directorate (ED) over alleged irregularities and financial bungling.
Saturday, 10 February 2018
खासदार शिवाजीराव आढळरावांची अपरिहार्यता!
पिंपरी : शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात बारीक लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. रेड झोन, पुणे-नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह पालिकेच्या विकासकामांबाबत त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्याला दुजोरा देत आहेत. मात्र,ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचे मानले जात आहे.


Subscribe to:
Posts (Atom)