Monday, 26 February 2018

पाणीपट्टी दरात निम्म्याने कपात

पिंपरी - महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टीवाढीच्या दरात निम्म्यापेक्षा जास्त कपात करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पाणीपट्टीवाढ ही अन्य प्रमुख शहरांच्या दराच्या आसपास येईल. 

रहाटणीतील गणेश बँकेला आग; कागदपत्रे जळून खाक

पिंपरी : रहाटणी येथील गणेश बँकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

पिंपरीत कांदा उतरला, टोमॅटो स्थिर

पिंपरी -पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्यांची व पालेभाज्यांची एकूण आवक व भाव किंचित घटले. कांद्याची आवक 19 क्विंटलने वाढून, भाव 150 रुपयांनी घटले. भेंडीची आवक पाच क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले.

सोलो तबला वादनाने जिंकली रसिकांची मने

निगडी – ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात आयोजित दोन दिवसीय संगीत संमेलनाची सांगता पं. रामदास पळसुले यांचे सोलो तबला वादनाने झाली. त्यांनी त्रिताला मधले पेशकर, कायदे, रेले, चक्रदार, तुकडे, मुखडे, गती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

प्रलंबीत प्रश्‍नाबाबत डोळ्यात धूळफेक

पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, रिंग रोड, निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प आदी प्रश्‍नांकडे सत्ताधारी भाजप सरकार सोयीस्कर डोळेझाक करीत आहे. शहरातील प्रश्‍न न सोडवता केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करुन आश्‍वासन देण्यापलिकडे काहीच करीत नसल्याचा आरोप चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेश नवले यांनी केला आहे.

बांधकाम मजुरांना ओळखपत्रांचे वाटप

पिंपरी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम मजुरांना लाभ मिळावा, याकरिता कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने बांधकाम मजुरांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

आधार लिंक केलेल्या रेशनकार्डधारकांनाच मिळणार धान्य

चौफेर न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे म्हटले असून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच १ मार्चपासून स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याने आता आधारकार्ड रेशन कार्डशी जोडावे लागणार आहे.