भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित शिल्पसृष्टी पिंपरी-चिंचवड शहरात उभारली जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही शिल्पसृष्टी साकरणार असून कलाकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 20 March 2018
एफएसआयची केवळ वल्गना
पुणे - शहरातील मेट्रोमार्गांभोवती प्रत्येकी ५०० मीटरच्या कॉरिडॉरची अधिसूचना राज्य सरकारने अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे पुनर्विकासाचे शेकडो प्रस्ताव रखडले आहेत. परिणामी राज्य सरकारने मेट्रोमार्गांभोवती मंजूर केलेल्या चार ‘एफएसआय’ची घोषणा ही केवळ वल्गना ठरली आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीती
पिंपरी - शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, एप्रिल ते जानेवारीअखेरपर्यंत नऊ हजार ५६८ श्वानदंशांच्या घटनांची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

शहर भाजपचे २८ पासून घर चलो अभियान
पिंपरी - भाजपच्या कामांची माहिती घरोघरी पोचविण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे.

राजकीय दबावामुळे रखडला वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मात्र, राजकीय दबावामुळे तो रखडला आहे.

चाकण-तळेगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण
चाकण-ऑटो हब असलेल्या येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर महाळुंगे इंगळे व खालुंब्रे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे असून रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, कंटेनर व ट्रेलरसारखी अवजड वाहने खड्डे चुकविताना थेट समोरच्या वाहनांवर जाऊन अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. अवजड वाहनांना या रस्त्यावरून दिवसा वाहतूक करण्यास बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर्यनला सुवर्ण पदक
निगडी – येथील सिटी प्राईड शाळेत सहावीत शिकणाऱ्या आर्यन दहिवालने राडारोड्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची वीट तयार होऊ शकतात व त्याचा वापर बांधकामासाठी करता येऊ शकतो, असे संशोधन केले आहे. या संशोधनाने राज्य पातळीवरील होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)