Friday, 4 May 2018

पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे अपंगांसाठी पेन्शन योजना – काळजे

चौफेर न्यूज –  अपगांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पिंपरीत अपंग केंद्राच्या कामाचे महापौर काळजे यांच्या हस्ते भूमिपूजन

अपंगासाठी पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे, मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. मोरवाडी येथे नि:समर्थ (अपंग) साठी बांधण्यात येणा-या कल्याणकारी केंद्राचे भूमिपूजन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयावर बहूजन रिपब्लिक सोसालिस्ट पार्टीचे आंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील बालाजीनगर, खंडेवस्ती परिसरात ऐन उन्हाळात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी टंचाई होवू लागली आहे. याकडे प्रभाग क्रमांक आठ मधील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालयावर आज (गुरुवारी) महिला व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासह विविध मागण्यांसाठी हंडा मोर्चा काढण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसात सदरील मागण्यांवर कार्यवाही न केल्यास क क्षेत्रीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे – भाऊ तोरसेकर

भ्रष्टाचाराच्या आरोपातून ए. राजा, कनिमोळी निर्दोष सुटले की न्यायव्यवस्था सुरक्षित असते. कर्नल पुरोहित निर्दोष सुटल्यास न्याव्यवस्था धोक्यात कशी? येते. संविधानाने संसद, सरकार आणि न्यायवस्थेला एकत्रित बांधले आहे. लोकसभा चालू दिली जात नाही. न्याय पालिकेवर संशय व्यक्त करत सरन्यायधीशावर महाभियोग आणला जातो. संसद चालू देणार नाही, न्याय व्यवस्था चालू देणार नाही. याला माफिया म्हणतात. मग, आता संविधान कोणापासून वाचवायचे आहे, याचा सुजान जनतेने विचार करावा. संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून  घ्यावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि  ‘जागता पहारा’ या एकमेव ब्लॉगचे लेखक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्य घटनेत बदल करण्याची तरतूद ठेवली असल्याचेही, त्यांनी सांगितले.

स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांना पिंपरी चिंचवड भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले.

नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी कुठलेही आयडी प्रुफ पुरेसे

नवी दिल्ली -आधार कार्ड अभावी कुठलाही ओळखीचा पुरावा (आयडी प्रुफ) नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी पुरेसा असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र किंवा वाहन परवाना यांसारख्या आयडी प्रुफच्या आधारे दूरसंचार कंपन्या नवे सिम कार्ड जारी करू शकणार आहेत. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी याबाबतची माहिती दिली.

खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेटस

चौफेर न्यूज – आधार कार्डामुळे कोणाच्याही खासगी माहितीला कुठलाही धोका नाहीय असे मत मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेटस यांनी व्यक्त केले आहे. उलट आधार कार्ड योजनेची दुसऱ्या देशात अंमलबजावणी व्हावी यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस फाऊंडेशनकडून वर्ल्ड बँकेला निधी पुरवण्यात येत आहे. भारतातील आधार कार्ड योजनेचे शिल्पकार नंदन नीलकेणी या प्रकल्पासाठी वर्ल्ड बँकेला मदत करत आहेत.