जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आयोजन केलेल्या डिजिटल महिला कार्यशाळेला महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 June 2018
विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून नऊ मार्गदर्शन केंद्रे
पुणे - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त सीबीएसईसह अन्य सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग एकमधील माहिती आणि गुणपत्रिकेसह कागदपत्रांची पडताळणी (अप्रूव्ह) अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत नऊ मार्गदर्शन केंद्रे सोमवारपासून (ता. ४) सुरू होणार आहेत.
विद्यार्थ्यांची हजेरी आता तीनवेळा!
पुणे : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "चिराग ऍप'ची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. तसेच विद्यार्थ्यांची हजेरीही तीन वेळा नोंदवायची आहे.
गौरी लंकेश हत्येचे पिंपरी-चिंचवड “कनेक्शन’?
पिंपरी – कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दिवसांपूर्वी म्हैसूरू येथील प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती. हे चौघेही एका संघटनेशी संबंधित असून त्यापैकी अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय-39) हा चिंचवड येथे राहणारा आहे. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्लायबिंग स्पर्धेत अमृता विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
निगडी – टोकियो येथे 2010 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत समाविष्ट केलेल्या स्पोर्टस् क्लायबिंग (स्पिड) या साहसी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच झारखंड येथील टाटा नगर, जमशेदपूर येथे जे. आर. डी. स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये पार पडली.
जगताप प्रतिष्ठानतर्फे कर्तुत्ववान 61 व्यक्तींचा गौरव
पिंपरी – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अधिक मास तथा पुरूषोत्तम पर्वकाळ याचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा जगद्गुरु व्दाराचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे.
प्रामाणिकपणा अजूनही जिवंत!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरुनगर येथील जलतरण तलाव परिसरात प्रामाणिकपणाचे दर्शन एका महिलेला घडले.
Subscribe to:
Posts (Atom)