Tuesday, 26 June 2018

नॉन ओव्हेन पिशवीविषयी व्यापाऱ्यांत संभ्रम

  • तीन महिन्यांपासून व्यापार ठप्प ः ठोस माहिती देण्याची मागणी
पिंपरी – राज्य सरकारने प्लॅस्टिक बंद करून चांगला निर्णय घेतला असल्याची चर्चा शहरात होत आहे; परंतु नॉन ओव्हेन पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याने त्यांचे व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारने नॉन ओव्हेन पिशवीविषयी नियमावली जाहीर करून ठोस माहिती देण्याची मागणी शहरातील नॉन ओव्हेन पिशवी विक्रेते करीत आहेत.

[Video] प्लॅस्टिकबंदीचा फूल व्यावसायिकांवर परिणाम

पिंपरी: प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांना फटका बसू लागला आहे. फुलांचा बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक एखादी भेटवस्तू देण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत.

'ओपनबार' म्हणजे दिव्याखाली अंधार

पिंपरी (पुणे) : बेकायदा धंद्यांना पायबंद घालून संबंधितांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य. मात्र, पोलिसांसमोरच असे अवैध धंदे चालत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कोठे? याचा प्रत्यय पिंपरी चौकात रविवारी सायंकाळी गस्तीवर आलेल्या पोलिसांमुळे आला. चौकात मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर हातगाड्या, टपऱ्या व पदपथावर तळीराम मद्य पीत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप असतो. त्यामुळे गस्तीवरील दोन पोलिस गाडीतून उतरले. मद्याच्या दुकानात जात काही तरी चौकशी करू लागते. मात्र, बाहेर हातगाड्यांवर मद्य पीत असलेले तळीराम व हातगाडी, टपरी चालकांमध्ये कोणतेच भीतीचे वातावरण नव्हते. 

व्यसन करणाऱ्यांची संख्या चिंताग्रस्त

पिंपरी - मानसिक ताण हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाचा आसरा घेतात. कालांतराने ही नित्याची सवय बनते. गेल्या काही वर्षांपासून व्यसन करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी ३० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांबरोबरच आयटीमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असल्याचे विमल फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. 

महासभेतील भाजप नगरसेवकांचे भांडण म्हणजे ‘बोका-मांजरीचा’ वाद – मारूती भापकर

पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणीनगरमधील शंभर कोटींच्या रस्त्यावरून महापालिका सभेत सत्ताधारी भाजपच्या दोन गटांतील ऐकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप टोकाला गेल्याने भाजपच्या नगरसेवकांचे भांडण म्हणजे ‘बोका-मांजरीचा’ वाद असल्याची उपरोधित टिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते दत्ताकाका सानेंच्या लेटरपॅड मध्येही महापालिकेचा भ्रष्टाचार

भांडार विभागाचा कारभार, तातडी साहित्य रजिस्टर (लोन रजिस्टर) मध्येही फेरफार 
 चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने भ्रष्ट्राचाराचा कळस गाठल्याची प्रचिती सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात आली. महापालिकेच्या भांडार विभागाने थेट विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या नावाने असलेल्या लेटरपॅड खरेदीतही भ्रष्ट्राचार केल्याचे साने यांनी उघडकीस आणले. यातून पुन्हा एकदा महापालिकेचा “खाओ और खाने दो” असा अनागोंदी कारभार असल्यास आरोप विरोधी पक्षनेते साने यांनी केला आहे.

Monday, 25 June 2018

मेट्रोकार्याला वेग

शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची जागा पुणे मेट्रोच्या इंटर-चेंज स्टेशनसाठी देण्यात आली आहे. या ठिकाणची काही गोदामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) पाडली असून, एका गोदामात मेट्रोचे कार्यालय सुरू झाले आहे. या गोदामाचे रंग-रूप बदलण्याचे काम वेगात सुरू आहे.