Sunday, 8 July 2018

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा; प्रकाश जावडेकर यांची घोषणा

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

६ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान नोंदणी करण्याचे आवाहन

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी सुभाष जयसिंघानी

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ निगडीचा 30 वा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि. 6) पार पडला. कार्यक्रमात रो. सुभाष जयसिंघानी यांची रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिवपदाची सूत्रे म्हणून जगमोहन सिंग भुर्जी यांच्याकडे देण्यात आली.

[Video] पिंपरी चिंचवडकरांचा पालख्यांना निरोप व इतर महत्वाच्या बातम्या


'साथ चल' दिंडीमध्ये संस्था, सोसायट्यांचा सहभाग

पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आई-वडिलांना सांभाळण्याची शपथ घेतली. 

आमदार जगतापांनी केले तुकोबारायांच्या पालखीचे सारथ्य

श्रीक्षेत्र देहू येथून आज कासारवाडी मध्ये आलेल्या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालखीरथाचे सारथ्य केले. त्यामुळे ते सोहळ्याचे एक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला.

माऊलींच्या पालखीत आमदार महेश लांडगे यांचा पर्यावरणपूरक ‘संदेश’ देणारा पेहराव!

पिंपरी (Pclive7.com):- राज्य शासनाने २३ जून रोजी प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय न घेता, निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरु झाली. हजारो किलो प्लास्टिक आणि लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजकाल सर्वच वस्तू प्लास्टिकच्या मिळत आहेत. त्यामुळे प्लास्टिकला नागरिकांनी जगण्याचा मूलाधार मानला आहे. प्लास्टिक मानवी जीवनासाठी आणि पृथ्वीसाठी अतिशय घातक आहे. प्लास्टिकचे हे अतिक्रमण रोखण्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे सज्ज झाले आहेत. त्यांनी आज माऊलींच्या पालखीचे स्वागत करताना पर्यावरण पूरक संदेश देणारा पेहराव केला होता.