Thursday, 2 August 2018

महापालिकेत चिखलीचा दबदबा

चिखली - महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर आता महापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता यासह क्रीडा सभापती तसेच महिला व बालकल्याण सभापती अशी पाच पदे एकाच वेळी चिखली भागाला मिळाली आहेत. महापालिकेतील निम्म्याहून अधिक पदे एकट्या चिखली भागाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यापुढील काही काळ तरी महापालिकेच्या राजकारणात चिखली केंद्रबिंदू राहणार हे निश्‍चित आहे. आक्रमक विरोधी पक्षनेता आणि महापौर एकाच गावातील असल्याचे महापालिका सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहावयास मिळेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाला फडकण्याची प्रतीक्षा

पिंपरी - देशातील सर्वाधिक उंचीचा निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात उभारलेला राष्ट्रध्वज (107 मीटर) वाऱ्याच्या झोताने सतत फाटत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गेल्या महिनाभरापूर्वी तो खाली उतरविला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) तरी या ध्वजाचे काम पूर्ण होऊन तो डौलाने फडकणे अपेक्षित आहे. 

उड्डाणपुलांवर पोस्टर्स लावणाऱ्यांवर गुन्हे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील उड्डाणपूल व महापालिका इमारतींवरील पोस्टर भित्तीपत्रके, जाहिराती काढण्याची जबाबदारी आता क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून अनधिकृत पोस्टर लावणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

प्रशासन विभागातील लुडबुडीला लगाम?

पिंपरी – आस्थापना विषयक कामकाजासाठी महापालिका प्रशासन विभागात वारंवार चकरा मारणाऱ्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. प्रशासन विभागात येणे गरजेचे असल्यास दुपारी तीननंतरच यावे, असे स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

"नो हॉकर्स झोन'मागे कोटींचे "अर्थ'कारण

पिंपरी - महापालिकेने सर्वेक्षण केलेले फेरीवाले सुमारे 10 हजार 188; सर्वेक्षण न झालेले फेरीवाले सुमारे 12 हजार; त्यांच्याकडून खासगी व्यक्तींकडून सरासरी दरमहा तीन हजार रुपये भाडे वसूल; म्हणजेच महापालिकेचा दरमहा बुडीत महसूल सुमारे तीन कोटी 60 लाख तर, वार्षिक बुडीत महसूल सुमारे 43 कोटी 20 लाख रुपये, असे आहे हॉकर्स झोन न झाल्यामुळे शहरात निर्माण झालेले अर्थकारण.

तरुणाईचा समाजोपयोगी “गणेशनगर मॉर्निंग वॉक’

रहाटणी – सुट्टीचा दिवस सत्कारणी लावण्याचा संकल्प केलेल्या थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशनगर मॉर्निंग वॉक करण्यात आला. या उपक्रमांतर्गत खड्डे बुजवणे, झाडे व खांबावरील अनधिकृत जाहिराती काढून विद्रुपीकरण थांबवणे, गतिरोधक दर्शक फलक व्यवस्थित करणे, अशी कामे तरुणांनी केली.

आकुर्डी येथे आतिक्रमण कारवाई

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे आकुर्डी येथे मंगळवारी (दि.31) अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयांक्षेत्रंतर्गत आकुर्डी गावठाण, बंटी ग्रुप समोर तसेच ॅक्‍सीस बॅंकेजवळ अनधिकृत दुकाने, टपऱ्या यांच्वार कारवाई करण्यात आली. यामध्ये 3-लोखंडी कांउटर, 11-हातगाडी, इ साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागातर्फे सध्या शहरात जोरदार कारावाई सुरु असून अनधिकृत फलक, हातगाड्या, टपऱ्या यांच्यावर मुख्यत्वेकरुन ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई सहशहर अभियंता राजन पाटील यांचे अधिपत्याखाली महापालिकेचे कार्यकारी अभियंता, 4 कार्यालयीन अधीक्षक,8 मुख्य लिपिक,40 मजूर, 1 मनपा पोलीस उपनिरीक्षक,10 मनपा पोलिस, 5डम्पंर, 1क्रेन, 1 जे.सी.बी तसेच 2 कनिष्ठ अभियंता,3 बीट निरीक्षक यांनी केली. वाहतुकीला अडथळा ठरणारे व परवाना नसलेल्या विक्रेत्यावर ही कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेल्या साहित्यावर दंडात्मकही कारवाई करण्यात येणार आहे.