Friday, 10 August 2018

5जी सेवा सुरू करण्याची तयारी वेगात

नवी दिल्ली: भारतात 2022 पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक 5जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. सुंदराजन यांनी म्हटले की, 2022 पर्यंत 5जी सेवा पूर्णांशाने सुरू होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.

वायसीएममध्ये डॉक्‍टरांच्या हंगामी भरतीस मान्यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टरांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेत 22 वरिष्ठ आणि 47 कनिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यात दिली आहे. ही नियुक्ती हंगामी स्वरुपाकरिता असणार आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे पाचवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन गुरुवारी (दि. 9) भोसरी येथे पार पडले. मात्र, मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे साहित्य संमेलन उरकते घेण्यात आले. इतर जातींप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु, आगामी काळात सर्वच आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.

रिक्षांना स्कूल बसचा परवाना कसा?

मुंबई – शालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
तीन आसनी रिक्षांमध्ये आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये लटकत असतात.त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. त्यांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमांत दुरूस्ती करा अन्यथा आम्ही आदेश देतो, असे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला बजावले.

यमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड

चौफेर न्यूज –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवली आहेत. मात्र निगडी यमुनानगर येथे पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका कंटेनरची तोडफोड करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण

चौफेर न्यूज –  दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लूने यंदाच्या वर्षी पुन्हा आपले तोंड वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात या तीन रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पिंपरी महापालिकेच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन

चौफेर न्यूज –  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन  चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार तसेच अतिरिक्त  आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.