Monday, 8 October 2018

शाळा पाहणीसाठी पालिका पदाधिकार्‍यांचा दिल्ली दौरा; पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, सर्व गटनेते, शिक्षण समितीचे सदस्य आणि काही अधिकारी दिल्लीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या रविवारी (दि.7) ते मंगळवारी (दि.9) अशा 3 दिवसांच्या दौर्‍यात तेथील शाळा व मोहल्ला क्‍लिनिकची पाहणी केली जाणार आहे.

प्राधिकरणाच्या कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्या – आमदार महेश लांडगे

विकसकांनी जबाबदारी पुर्व केल्यानंतरच ना-हारकत प्रमाणपत्र द्यावे
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली. तसेच प्राधिकरण हद्दीतील विकसकांनी गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी करण्यात यावी. ज्या विकसकांनी पूर्तता केली नाही, अशा विकसकांना येत्या आठ दिवसात नोटीसा देण्यात याव्यात. सोसायटीतील प्रलंबित समस्याकरिता कॅम्प घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

आम्ही पोलीस आहोत, पटापट पाकिटे काढा!

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना मारहाण, लुटालुट
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने पकडून दिले पाकिटमाराला

राष्ट्रवादीकडून मावळसाठी वाघेरे, भोईर इच्छूक

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी याठिकाणाहून लढण्याची इच्छा पक्षाच्या मुंबईतील आढावा बैठकीत व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत, मावळातून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.

शिवसेनेचे महापालिकेत “ठिय्या आंदोलन’

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या “एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेना गटनेते राहुल कलाटे व मारुती भापकर यांनी शनिवारी (दि. 6) सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयीन कामकाजानंतर सुरु झालेले हे आंदोलन माहिती मिळाल्याशिवाय मागे न घेण्यावर कलाटे व भापकर ठाम आहेत. त्यामुळे सहशहर अभियंता कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

दहावी, बारावी परीक्षा; वेळापत्रक जाहीर

चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, बारावीचे ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहे.

शहरात प्रथमच भव्य मोरया युथ फेस्टिव्हलचे आयोजन

मोरया युथ फेस्टिव्हलच्या ‘लोगो स्पर्धे’ची घोषणा
चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.