Monday, 8 October 2018

Manja slits throat of woman doctor on scooter


गुन्हे शाखेत ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात हजर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. आयुक्तालयातील ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुन्हे शाखेत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी (दि.६) रात्री काढले. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव व कोठून कोठे हे पुढील प्रमाणे…

शहरात ३ हजार ६०० रिक्षा धावतात विनापरवाना...

रिक्षासाठी परवाने खुले झाल्यानंतर त्यात भर पडली आहे. मात्र, नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अनेकजण पुन्हा ‘आरटीओ’कडे फिरकतच नाही. सद्यस्थितीत 3600 रिक्षांची नोंदणी होऊन पुढील प्रक्रियेसाठी रिक्षाचालक पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या सर्व रिक्षा अनधिकृतपणे शहरात धावत असल्याची माहिती समोर आली आहे.    

पंतप्रधान आवास योजनेची निविदा प्रक्रीया रद्द करा; खासदार बारणे यांची केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील च-होली, बोऱ्हाडेवाडीसह इतर ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदा पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी  संघनमताने भरल्या आहेत. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे  संपूर्ण निविदा प्रक्रीया रद्द करावी आणि नव्याने फेरनिविदा काढण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.  तसेच निविदांमध्ये अफरातफर करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शिक्षक वर्गीकरणासाठी फुटला प्रत्येकी पाच लाखांचा भाव; राष्ट्रवादी, शिवसेना सदस्यांचा आरोप

जिल्हा परिषदेचे 50 शिक्षक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवा वर्गीकरण्यासाठी प्रत्येकी 5 ते 8 लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे. सदर विषय प्रशासनाचा असताना आयुक्तांशी संगणमत करून सदस्य प्रस्ताव ऐनवेळी दाखल करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या विषयाला विरोधकांचा विरोध नोंदवून आयत्यावेळी शिक्षण समितीने गुरूवारी (दि.4) मंजुरी दिली.

पक्षनेत्यांकडून प्रेमलोक पार्क येथील पोलिस आयुक्तालयाच्या कामाची पहाणी

पोलिस आयुक्तालय इमारतीचे दिवाळीपर्यंत उद्घाटन, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती

शाळा पाहणीसाठी पालिका पदाधिकार्‍यांचा दिल्ली दौरा; पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, सर्व गटनेते, शिक्षण समितीचे सदस्य आणि काही अधिकारी दिल्लीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या रविवारी (दि.7) ते मंगळवारी (दि.9) अशा 3 दिवसांच्या दौर्‍यात तेथील शाळा व मोहल्ला क्‍लिनिकची पाहणी केली जाणार आहे.