Friday, 14 December 2018

PCMC mayor Rahul Jadhav stands firm on Chikhali STP location

PIMPRI CHINCHWAD: Mayor Rahul Jadhav said the civic body will construct a sewage treatment plant(STP) in Chikhali to check pollution of the Indrayani .

‘रेडझोन’ची जमिन खरेदी करू नका

पिंपरी - दिघी, वडमुखवाडी, भोसरी येथील रेडझोन हद्दीतील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीनविक्रीची ‘दुकाने’ थाटली आहेत. मात्र, ‘रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते,’ असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे. 

बहुचर्चित डिजीटल घड्याळाचा प्रस्ताव फेटाळला

पिंपरी- शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने 7 कोटी खर्चुन सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी 4 हजार 544 स्मार्ट वॉच थेट पद्धतीने भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला. मोघम प्रस्ताव सादर न करता त्याची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करा. त्यानंतर बघू, अशी स्थायी समिती सदस्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे. ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

महापालिका सेवक पत संस्थेवर कारवाईचा इशारा

पिंपरी – जिल्हा उप निबंधकांनी मागवलेला खुलासा वेळेत सादर न केल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पत संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उप निबंधक बी. टी. लावंड यांनी दिला. माजी संचालक गणेश भोसले यांनी तक्रार केली होती.

जागतीक भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त मोशीत बैठक

पिंपरी- जागतीक भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मोशीतील प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. ग्राहकांना आपले अधिकार समजावून सांगणे आणि ग्राहक जागृती करणे, ग्राहकांचे न्याय हक्‍कांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडणे व न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी अवलंबावयाच्या कार्य पद्धतीचा या बैठकीत उहापोह करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे स्थलांतरण पुन्हा लांबले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या चिंचवड येथील इमारती येथे सोमवारी (दि. 10) स्थलांतर होणार होते. मात्र अद्यापही इमारतीची कामे पूर्ण झालेली नसल्याने आयुक्तालयाचे स्थलांतर पुन्हा लांबले आहे.

Wednesday, 12 December 2018

पिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर

पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचे सादरीकरण अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमोर केले.