Monday, 4 February 2019

पर्यावरणासाठी जीवसृष्टी संवर्धन

पिंपरी - विविध कारणांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जैवविविधता अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांवर होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या माध्यमातून सध्याच्या जैवविविधतेचे विविध पैलू व शहर क्षेत्रातील जैवविविधता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, त्यांच्याकडूनही सूचना मागविणार आहेत.

खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम लवकरच

पिंपरी - मोशी येथील २४० एकर जागेत प्रस्तावित असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पहिल्या टप्प्यात २०.११ हेक्‍टर जागेमध्ये खुले प्रदर्शन केंद्र साकारणार आहे. या कामासाठी ४४ कोटी २२ लाख खर्च अपेक्षित आहे. कार्यादेश देऊन महिनाअखेर हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. 

पिंपरी-चिंचवड : विकासकामे की अपघातास निमंत्रण?

पिंपरी – सध्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवड महानगपालिकेचा विकास कामांचा धडाका सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, ग्रेड सेप्रेटर भूमिगत रस्ते, पूल, मेट्रो आणि रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु ही कामे सुरू असताना सुरक्षेचे नियम ठेकेदार पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. बिजलीनगर परिसरात अलीकडेच रस्त्याचा मोठा हिस्सा खचला. बस निघून गेली आणि रस्ता खचला, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पिंपरी- चौकाचौकात वाहतूक नियम धाब्यावर

पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील चौका-चौकात खुलेआम वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने प्रशस्त रस्ते असूनही वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रत्येक चौकात वाहतूक नियम मोटार चालकांकडून धाब्यावर बसवण्यात येत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांकडून पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर, काही ठिकाणी पोलीसच वाहतूक नियम मोडत असल्याचे चित्र आहे.

रस्ते खोदाईतील निष्काळजीपणा उठला प्रवाशांच्या जिवावर

पिंपरी चिंचवड ः सध्या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगपालिकेचा विकास कामांचा धडाका सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, ग्रेड सेप्रेटर भूमिगत रस्ते, पूल, मेट्रो, बीआरटी प्रकल्प यांची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु, सदरची कामे सुरू असताना सुरक्षेचे नियम ठेकेदार पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. अशा निष्काळजीपणाचा फटका नुकताच प्राधिकरण आणि वाल्हेकरवाडीतील रहिवाशी प्रवास्यांना बसला. सध्या बिजलीनगर येथे ग्रेड सेपरेट कामाकरता खोदाईचे काम सुरू असून, काम करत असताना सुरक्षा हेतू पालिकेच्या नियमांचे तंतोतंत पालन सदस्थितीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिवर्तन सभेत धनंजय मुंडेंचे सुचक वक्तव्य

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी भरपूर काम केलयं. तरी देखील मागची अनेक निवडणूक मावळची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हारली आहे. आता माझी एक व्यक्तिगत विनंती आहे. महाभारतामध्ये सुध्दा एकदा प्रश्‍न असा झाला, की श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणावं लागलं आता उठ पार्था.. तुझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपल्यासाठी अजित पवारांनी स्वत:ला झिजवलं आहे. त्यांना आता काहीतरी देण्याची वेळ आहे. या परिवर्तनामध्ये आपले आशिर्वाद द्या, असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा पिंपरी चिंचवड येथे पोहोचली. सांगवी येथे झालेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बालाजीनगर येथे ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू

भोसरी ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बालाजीनगर येथे  ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. याकामी महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, समर कामतेकर यांनी पाठपुरावा केला होता. बालाजीनगर येथे महापालिकेचा दवाखाना नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. महागड्या वैद्यकीय उपचारामुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागत होते. तसेच महापालिकेचा दवाखाना नसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य, कामगार यांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सीमा सावळे, सारंग कामतेकर  यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले.