पिंपरी (Pclive7.com):- राज्यभर विरोधक भारतीय जनता पार्टीवर आरोप करत सुटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात स्वत:ची घरे भरली. बगलबच्चे मोठे केले; परंतु भाजपने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले. दलालांची फौज बंद केली, अशी टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 9 February 2019
शिक्षण समितीचा सावळा गोंधळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्य सेवेत पाठविण्याबाबतचा ठराव महासभेने मंजूर केल्यानंतर पुन्हा शिक्षण समितीने शिंदे यांना राज्यसेवेत पाठविण्याचा ठराव आयत्यावेळी मंजूर केला आहे. अंतिम मान्यतेसाठी ठरावाची महासभेकडे शिफारस केली आहे. महापालिकेतील सर्वोच्च असलेल्या महासभेने ठराव केल्यानंतर पुन्हा शिक्षण समितीने तोच ठराव मंजूर केल्याने समितीतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
बेरोजगारी देशासमोरील मोठे आव्हान – डॉ. प्रफुल्ल पवार
पिंपरी – आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्यापैकी 5 टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने 95 टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.
एमपीसी न्यूज इफेक्ट : दर्शन हॉलसमोरील भुयारी गटाराचे झाकण दुरुस्त
एमपीसी न्यूज- चिंचवड-पिंपरी लिंकरोडवर दर्शन हॉलजवळ भुयारी गटाराचे झाकण धोकादायक स्थितीत असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. अशा आशयाची बातमी एमपीसी न्यूजवर 6 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन पिंपरी महापालिकेच्या संबंधित विभागाने या झाकणाच्या त्वरित दुरुस्ती केली.
Pune : पुणे गारठले ! पारा 5.1 अंशावर
एमपीसी न्यूज-आठवड्यापूर्वी पुण्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पुण्यातून थंडीने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच आज पुण्यातील किमान तापमानाने नीचांक गाठला आहे. आज पुण्याचे किमान तापमान 5.1 अंश सेल्सियस इतके नोंदले गेले आहे. गेल्या दहा वर्षातील पुण्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे.
Bopkhel: बोपखेलच्या आरक्षित जागेवर विकसित होणार उद्यान
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल येथील आरक्षित जागेवर महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे.
Monday, 4 February 2019
महेश लांडगे आणि मंगलदास बांदल या राजकीय पैलवानांच्या भेटीने चर्चेला ‘उधाण’
पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरण्यास तीव्र इच्छूक असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी आज भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले असले तरी आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण खलबते झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)