पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले शीतल शिंदे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. सत्ताधारी भाजपकडून विलास मडेगिरी यांनाच मतदान करण्याचा व्हिप देखील सदस्यांना बजावण्यात आला होता. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे विलास मडेगिरी विजयी झालेत. त्यांना शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी युतीचा धर्म पाळत मडेगिरींना मतदान केले. मडेगिरी यांना १६ पैकी १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या मयुर कलाटे यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 7 March 2019
महापालिका आणि प्राधिकरणाच्या जागेवरील अनधिकृत घरे अधिकृत होणार; आमदार जगतापांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनी दिलेल्या निवेदनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या शहरी भागात सरकारी जमिनीवर (वन जमीन वगळून) असलेली सर्व अनधिकृत घरे अधिकृत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड 52 व्या स्थानी
स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचे स्थान 52 व्या क्रमांकावर आले आहे. शहर पुन्हा पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाच्या पथकामार्फत जानेवारी महिन्यात शहरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या अभियानासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जय्यत तयारी केली होती. यंदा प्रथमच खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून जनजागृती, मोबाईल अॅप डाउनलोड, घरोघरी जाऊन माहिती देणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले होते. तसेच, शहरातील सर्व चौका-चौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. संपूर्ण शहर चकाचका करण्यात आले होते.
विनापरवाना फ्लेक्स, फलकांवरील फौजदारी गुन्हे दाखल करण्यात पालिका उदासीन; सामाजिक कार्यकर्ते सरदार रवींद्र सिंह यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना फ्लेक्स, फलक, किऑक्स, कमानी आदींवर कारवाई करून ते जप्त करण्याचे कामाची वर्क ऑर्डर सामाजिक कार्यकर्ते सरदार रवींद्र सिंह यांना दिले आहे. मात्र, कारवाईनंतर संबंधित दोषी व्यक्ती किंवा एजन्सीवर फौजदारी कारवाई करून दंड वसुलीचा उल्लेख करारनाम्यामध्ये नाही. त्यामुळे शहरात विनापरवाना फ्लेक्स व फलक लावण्यास अटकाव राहणार नाही. परिणामी, पालिकेची ही कारवाई निव्वळ दिखाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोफत कारवाई काम करण्यास रवींद्र सिंह यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
अरे बापरे…चक्क माजी विरोधी पक्षनेत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यावधीचा लावला चुना
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामूळे 16 विभागीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी महापालिकेला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत आहे. शहरातील हजारो मिळकतींचा नोंदणी न करता अधिकारी व कर्मचा-यांना घरबसल्या लाखो रुपयांचा आर्थिक मलिदा मिळू लागला आहे. त्यामुळे करसंकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजारो अनधिकृत आणि जून्या मालमत्तेच्या नोंदणी करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करीत आहेत. याबाबत चिंचवडच्या सर्व्हे नं. 129 मधील एका माजी विरोधी पक्षनेत्यांच्या चार मजली आरसीसी इमारत असलेल्या 48 खोल्यांची गेल्या दहा वर्षापासून महापालिकेकडे नोंद नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे
अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन काँग्रेसने केला अनोखा निषेध
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने महापालिकेच्या अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला. महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत आणि आरोग्य अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेणा-या महिलांचा ‘इनरव्हील क्लब’कडून सन्मान
एमपीसी न्यूज – प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेणा-या विरांगणांचा इनरव्हील क्लबकडून सन्मान करण्यात येणार आहे. अनघा मोदक आणि दीक्षा दिंडे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)