एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वादग्रस्त सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांना कामानिमित्त भेटायला गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला त्यांनी केबीनमधून बाहेर जाण्यास सांगितले. दिव्यांगांना झगडे यांनी अपमानास्पद वागणूक दिली असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची सहाय्यक आयुक्त पदावरून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 March 2019
पिंपळे सौदागरमधील शिवसृष्टीचे आमदार जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
एमपीसी न्यूज – नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथे लवकरच ‘शिवसृष्टी’ साकारणार आहे. या शिवसृष्टीच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला दिन : ऑल राउंडर लेडी सिंघम
नारी हे सरस्वती, काली, लक्ष्मी व पार्वतीचे रूप असते. ती एकाच वेळी आई असते, कर्तव्यावर अधिकारी असते आणि स्वतःसाठी वेळ देणारी सखीही असते. असाच एक मिलाप म्हणजे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील. मुलींची जबाबदारी, घरातील कामे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम त्या तेवढ्याच तत्परतेने पेलतात हसतमुखाने…
Manhole in Pradhikaran poses threat to riders
Residents and commuters cry foul as the open manhole in Krishna Nagar has been left neglected for the past one month.
पुणे-नाशिक महामार्गावर “रॉंग साईड’ने वाहने सुसाट
भोसरी – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते मोशी दरम्यान “शॉर्टकट’साठी विरुद्ध दिशेने बिनदिक्कतपणे वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे अपघात होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी “रॉंग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली असतानाही कर्मचारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत.
वाकडमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरणाबरोबरच विकासकामांचा ‘सपाटा’
पिंपरी चिंचवड ः वाकड-पिंपळे निलख प्रभाग 26 मधील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाबरोबरच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 25 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक तुषार कामठे, संदीप कस्पटे आदी उपस्थित होते.
Thursday, 7 March 2019
‘प्राधिकरण खरचं धंदेवाईक नसेल, तर याच जागेची सोडत काढा’ – त्रस्त भूखंडधारक
पिंपरी (दि. ७ मार्च) :- मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर नं. ६ येथील जलवायू विहार शेजारील प्लॉट नंबर ३० ते ७५ या बंगलो प्लॉटचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्याठिकाणी प्राधिकरणामार्फत “घरकुल” सारखी स्कीम होणार आहे. हे भविष्यकाळात परीसराच्या वैभवावर दुष्परीणाम करणारे ठरु शकते. सेक्टर ५, ८, ११, १२, १४, चिखली, मोशी गायरान येथे शेकडो एकर जागा शिल्लक असतानासुध्दा सेक्टर ४, ६, ९ या उच्चभ्रू लोकजीवनावर दुरगामी वाईट परीणाम करणारा हा गृहप्रकल्प येथे नकोच, इतरत्र करा, अशी ठाम भुमिका मोशी प्रधिकरण संतनगर सेक्टर ४, ६, ९ मधील तमाम मुळ रहिवाशी नागरीकांची आहे.
Subscribe to:
Posts (Atom)