Pimpri Chinchwad: The civic body's property tax department faces an uphill task of collecting Rs73 crore over the next two days to achieve its annual target of ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 1 April 2019
मेट्रोसाठी फ्रान्सचे ‘सिग्नल’
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील पिंपरी -स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मेट्रो मार्गासाठी सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन सिस्टिम फ्रान्समधील ‘अलस्टॉम’ कंपनी करणार आहे. जागतिक स्तरावरील पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत ‘अलस्टॉम’ला सुमारे २४० कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग येणार असून, कंपनीकडून अल्पावधीतच काम सुरू होईल.
इंग्रजीतील बोलणे ऐका मराठीत
पुणे - एखादा माणूस इंग्रजीत बोलत असताना, त्याचे संभाषण तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू आले तर! काय, आश्चर्य वाटतंय ना! अहो, पण हे लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे बरं का! एवढंच नव्हे तर तुम्ही मराठीतून साधलेला संवाद त्या संबंधित माणसाला त्यांच्या इंग्रजीत ऐकू जाणार आहे. हो, देशात "स्पीच-टू स्पीच' भाषांतर करण्याचे नवे तंत्रज्ञान "सी-डॅक'मार्फत विकसित होत आहे.
जप्तीची कारवाई टाळण्याकरीता मिळकत कर भरा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. कोषागारात आजपर्यंत मालमत्ता करातून 435 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. महापालिकेने जप्तीची कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील हापूस जातीचा पहिला आंबा पिंपरी कँम्पातील फ्रुट मार्केटमध्ये आला आहे. याशिवाय बदाम आणि लालबाग जातीचे आंबेही विक्रीसाठी आले आहेत. या मोसमातील पहिला आंबा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कार्यालय सापडेना
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडसाठी स्वतंत्र कार्यालयासाठी महापालिकेच्या 5 ते 6 इमारतींची पाहणी केली गेली आहे. मात्र, सदर इमारती स्मार्ट सिटीच्या अधिकारी व संचालकांना पसंत पडत नसल्याने कार्यालय निश्चित झाले नाहीत. स्मार्ट सिटीची एसपीव्ही कंपनी स्थापन होऊन वर्ष लोटत आले तरी अद्याप कार्यालयाचा शोध सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कारभारावर परिणाम होत आहे.
पालिका भवन परिसरात तब्बल 27 मोटारी धुळखात
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या पार्किंग परिसरात तब्बल 27 मोटारी धुळखात पडून आहेत. तर, असंख्य दुचाक्यांचा खच पडला आहे. त्याचबरोबर वापरात नसलेले फर्निचर व साहित्य पडून आहे. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या वाहन व फर्निचरमुळे अस्वच्छता निर्माण होऊन रोगराईसह सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पडिक भंगार साहित्यामुळे वाहनांना पार्किंग अपुरे पडत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)