कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका विभाग आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक मयुर कलाटे, उषाताई वाघेरे, सुलक्षणाताई धर, उषाताई काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काळभोर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, श्याम जगताप , तानाजी जवळकर, पुणे ग्रामीण विध्यार्थी अध्यक्ष करण कोकणे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 5 May 2020
महापालिकेच्या अन्य रुग्णालयात सुध्दा नागरिकांना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळणार
कोरोना कोविड – 19 या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी व प्रतीबंधा साठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे इतर राज्यातील तसेच महाराष्ट्राचे बाहेर जिल्हयातील स्थलांतरीत मजूर, पर्यटक, विद्यर्थी अडकून पडलेले आहेत. या सर्वांना त्यांचे इच्छेनुसार मूळ गावी जाण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्या आलेली आहे.
गावी जाण्याच्या परवानगीसाठी भली मोठी रांग
पिंपरी – गावी जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी घेण्यासाठी शहरातील पोलीस ठाण्याबाहेर भली मोठी रांग लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात “वाइन’साठी मोठी “लाइन’
पिंपरी – “बडे दिनों के बाद मिली है… दे दारु दे दारु…’ या हिंदी चित्रपटाला सार्थ करत पिंपरी-चिंचवड शहरामधील मद्यप्रेमी सोमवारी (दि. 4) वाइन शॉप्सवर अक्षरश: तुटून पडले. सकाळी सात वाजल्यापासूनच मद्यपींनी “वाइन शॉप’ बाहेर साधारण एक किलोमीटरहून अधिक लांबलचक रांगा लावत दारू विकत घेण्याचा आनंद दिसत होता.
भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम आढावा घेऊन सुरु करावे -सुमन पवळे
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम कोरोनामुळे महिन्याभरापासून बंद आहे. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुलाचे काम करता येईल काय़?, याचा आढावा घ्यावा. काम करता येत असल्यास तत्काळ सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका […]
Monday, 4 May 2020
The Real Warrior : कोरोना विरोधात लढणा-या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांचा भारतीय सैन्यदलाच्या वतीने सन्मान
कोरोनाला हरविण्यासाठी व कोवीड १९ वर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व कोरोना रूग्णांवर रूग्णालयात उपचार करणाऱ्या महापालिकेच्या डाॅक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांना “कोरोना वाॅरियर्स” म्हणून गौरविण्यात आले. बाॅम्बे इंजिनिअरींग ग्रूपचे प्रमुख स्टेशन कमांडंट ब्रिगेडीअर सेना मेडल एम. जे. कुमार यांनी सैन्यदलाच्या वतीने केक कापून व मिठाई देवून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)