Thursday, 7 May 2020

अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवार भागवतयं दररोज शेकडो भुकेल्यांची भूक..!

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या धर्तीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरजू कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या महिनाभरापासून दररोज चारशे ते पाचशे लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

नितीन भोसले सोशल वेल्फअरकडून पोलिसांना मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोजचे वाटप

पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरूध्दच्या या लढाईत अनेक संस्थांनी सामाजिक भान ठेवत प्रेरणादायी कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नितीन भोसले सोशल वेल्फेअरकडून पोलीस बांधवांना मास्क,सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोजचे वाटप नुकतेच करण्यात आले.

मद्यप्रेमींनो ऐकलंत का ? तुम्हाला काय आहे सवलत वाचा...

पुणे : व्यक्तीला दारू खरेदी करणे, ते जवळ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, ते स्वतः:च्या घरात पिणे असो की घरात ठेवायचे झाल्यास त्याला उत्पादन शुल्क विभागाकडून सशुल्क परवाना घेणे कायद्यानेच बंधनकारक आहे. 1 दिवसापासून ते आजीवन पर्यंत हा परवाना मिळतो. मात्र राज्याचे उत्पादन विभाग आणि दारू विक्रेत्यांच्या उदासीनतेमुळे राज्य सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

'दारू विक्रेत्यांनो, 'या' नियमांचे पालन करा नाहीतर...'; जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय इशारा!

पुणे : सूचनांचे पालन न करणाऱ्या आणि गर्दीवर नियंत्रण राहत नसल्याचे निदर्शनास आल्यास मद्य विक्री करणाऱ्या त्या दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे अर्ज भरण्यास स्थगिती दिली आहे. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी ही माहिती दिली. 

पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकास हवाच !

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने जगभरात धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउन, सोशल डिस्टन्ससारख्या उपायांनी त्याला आळा घालता येत आहे. मात्र, दाट झोपडपट्टीच्या भागात याला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तिथे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भविष्यात अशा आजारांना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासाला महत्वाचे स्थान दिले आहे.

बांधकाम प्रकल्पांना तीन महिने मुदतवाढ; 'महारेरा’चा निर्णय

‘महारेरा’चा निर्णय; ग्राहकांना द्यायच्या भरपाईत सूट देण्याची मागणी
पुणे - कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थीवर मात करण्यासाठी १५ मार्च नंतरच्या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय महारोराने घेतला आहे. परंतु हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हरियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने ही नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी. तसेच या दरम्यानच्या कालावधीत ग्राहकांना द्यावयाच्या भरपाई बाबत सूट देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून केली जात आहे.