MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 12 May 2020
उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघुउद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र (कंन्टेन्मेंट झोन) वगळून विकासकामे, पावसाळ्यापुर्वीची कामे करावीत, असेही बारणे यांनी सांगितले आहे.
कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे: विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लाऊन रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्कारुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज काढले.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आमदार अण्णा बनसोडे यांची पाहणी
पिंपरी-चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज आमदार अण्णा वनसोडे यांनी आज परिचारिका दिना निमित्ताने भेट दिली आणि परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे, मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, रुग्णालयाच्या अधिसेविका व मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर मांडला असता, आमदार बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा, कर्मचार्यांना संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले
कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या सरकारच्या आदेशाला केराची टोपली ; कामगार विभागात 68 तक्रारी
पुणे : लॉकडाऊनमुळे कंपनीचे उत्पादन घटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे कारण पुढे करत कामावरून काढून टाकण्यात आले किंवा पगार कपात केल्याच्या 68 तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत. कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते.
करोना बाधितावर अत्यंसंस्कारास नातेवाईकांचा नकार
दीडशे फूट लांबून पाहिला मृत्यूदेह; कर्मचाऱ्यांकडे पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव
Subscribe to:
Posts (Atom)