Monday, 18 May 2020

महावितरणचा राज्यातील पहिलाच प्रयोग: 'वेबीनार'मार्फत वीजग्राहकांशी साधला संवाद

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पिंपरी विभागातील 180 हाऊसिंग सोसायट्यांचे फेडरेशनच्या 56 प्रतिनिधीशी 'वेबिनार'च्या माध्यमातून संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील अशा संवादाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. 

अग्निशामक दलाचे जवान ठरले “देवदूत’; ड्रेनेजमध्ये अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पिंपरीच्या खराळवाडी भागात शनिवारी (दि. 16) सकाळी एक गाय ड्रेनेजमध्ये अडकली होती. नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने गायीला सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र अग्निशामक दलाच्या “देवदूत’ नावाच्या वाहनातून आलेले जवान त्या गायीसाठी “देवदूत’ ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

कुटुंबनिहाय पाणी वापराचे ऑनलाइन सर्वेक्षण सुरु

पिंपरी  (प्रतिनिधी) – टाटा मोटर्स आणि इनव्हायर्नमेंटल कन्झर्व्हेशन असोसिएशन (ईसीए) यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे कुटुंबनिहाय पाणी वापर तपासण्यास सुरवात केली आहे. “सर्व्हे मंकी’ या संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जात आहे.

ट्रॅफिक वॉर्डनकडे मात्र दुर्लक्ष

पिंपरी (प्रतिनिधी) –वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील चौका चौकात ट्रॅफिक वॉर्डन राबत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे ट्रॅफिक वार्डन पुरवणारी कंपनी, महापालिका प्रशासन आणि पोलीस या तिघांनीही सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.

105 कामे पूर्ण करण्यास परवानगी

पिंपरी (प्रतिनिधी) – करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरतील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. इमारती, गटारे, रस्ते, नाले, पूल व प्रकल्प, उद्याने अशा स्थापत्य विभागातील आठ क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, स्थापत्य उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनिसारण विभागातील अशी 105 कामे तातडीने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.