Tuesday, 17 September 2013

नगरसेवकांच्या मानधनात तिप्पट वाढीचा प्रस्ताव

दरमहा 25 हजारांचे मानधन देण्याची मागणी
खासदार, आमदारांपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमध्येही मानधनवाढीच्या मागणीचे लोण पसरले आहे. महागाईची धग नगरसेवकांनाही बसत असल्याचे कारण पुढे करीत महापौर मोहिनी लांडे यांनी नगरसेवकांच्या मानधनात तिप्पट वाढीची मागणी केली आहे.

पिंपरी पालिकेच्या ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून शासकीय कार्यालयांची माहिती मिळणार

महिन्यापूर्वी सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून माहिती घेण्यासाठी तसेच विविध तक्रारी करण्यासाठी एका महिन्यात तब्बल पाच हजार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

महिन्यात ‘सारथी’ने सोडविल्या ५८ टक्के तक्रारी

पिंपरी : महापालिकेने नागरिकांच्या सोईसाठी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइन सुविधेला एक महिना पूर्ण झाला. या कालावधित १४00 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ८२५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ५७५ तक्रारी प्रलंबित असून निराकरण केलेल्या तक्रारींचे प्रमाण ५८ टक्के आहे. 

विर्सजन मिरवणुकीच्या खर्चातून ...

रहाटणी काळेवाडी फाटा येथील गजानन मित्र मंडळाने यंदा विर्सजन मिरवणूक रद्द करुन 30 हजारांचा निधी गरीबांच्या शस्त्रक्रियेसाठी दिला आहे.
माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा

शमा धुमाळ ठरल्या 'मिसेस पिंपरी-चिंचवड'

पिंपरी-चिंचवड महोत्सवांतर्गत आयोजित मिसेस पिंपरी-चिंचवडचा किताब यंदा शमा धुमाळ यांनी जिंकला. लीना कोळंबकर यांनी द्वितीय तर पियू खटावकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
मिसेस पिंपरी-चिंचवड, लिटील मास्टर सेफ, नृत्य, स्लो

कवितांच्या अविष्कारात रंगला पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचा समारोप

कवितांच्या अविष्कारात रंगला पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचा समारोप
'फुलांवरी प्रेम इथे सारेजण करतात, जिची काटय़ांवर माया तिला आई म्हणतात'...अशा वैविध्यपूर्ण काव्य रचना आणि गीतांच्या संगीतमय सादरीकरणाने 'पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल'मध्ये रंगत आली.

लोकलमधून पडून एक प्रवासी ठार; एकजण ...

पिंपरी, आकुर्डीत दोन वेगवेगळ्या घटना 
एकाच दिवसात दोन घटनांमध्ये लोकलमधून पडून एकजण मृत्युमुखी पडला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला. या पैकी एक घटना आज सकाळी आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ घडली तर दुसरी पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ सायंकाळी