Friday, 22 September 2017

कचराकुंड्या ओसंडून वाहताहेत, नुसते हातात झाडू घेऊन काय मिरवताय...?

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु अशा वेळी लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाला धारेवर धरण्याऐवजी तेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिरवण्यात मशगुल झाले आहेत," अशी टीका पिंपळे गुरवचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून कचराकुंड्यामधील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल जगताप यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला.

कचऱ्यापासून इंधन निमिर्तीचे दोन प्रकल्प रखडले!

अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट : प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सुरू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील कचरा डेपो परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्यास सुरूवात केली. परंतु, त्या ठिकाणी एकच प्रकल्प सुरू असून, दोन प्रकल्प अद्यापही रखडले आहेत. याबाबत अधिक माहिती देण्यास पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

लोहमार्ग विस्ताराचे काम मंदगतीने

पुणे ते लोणावळा उपनगरीय आणि मुंबईपर्यंतच्या रेल्वे वाहतुकीच्या विस्तारासह पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पासाठी ...

श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

– 16 लाखांचे धनादेश “बाउन्स’
पिंपरी – “सीएनजी कीट’ बसविलेल्या ऑटो रिक्षा परवाना धारकांना महापालिकेने अनुदान वाटप केले होते. मात्र, रिक्षा चालकांचे 16 लाख रुपयांचे धनादेश “बाउन्स’ झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पर्यावरण अधिकाऱ्याने हात झटकले असून, लेखा विभागाने दिलेले धनादेश आम्ही वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Externed woman criminal lands in Pimpri police net

He added that the duo confessed to three cases of house break-ins in Pimpri and Bhosarilast month during questioning. "We have detected two burglaries registered with Pimpriand one with Bhosari police. We have also recovered gold ornaments worth Rs ...

देशी गाईच्या दुधाला ‘भाव’

पुणे - देशी गाईचे दूध रोगप्रतिकारक असल्याचा प्रचार होत असल्यामुळे या गाईच्या दुधाला मागणी वाढत आहे. प्रत्यक्षात उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात देशी गाईंच्या दुधाच्या उत्पादनासाठी शंभराहून अधिक ‘फार्म्स’ उभे राहिले आहेत. या दुधाला प्रतिलिटर ५० ते ९० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी आणि काही व्यावसायिकही देशी गाईंच्या पालनाकडे वळू लागले आहेत.

"सोफोश'मधील चिमुकल्यांना "मातृदूध'

पुणे - जगात येऊन जेमतेम काही तासांमध्ये त्याला जन्मदात्यांनी सोडून दिले. सात दिवसांच्या "त्या' चिमुकल्याला "सोफोश' संस्थेमध्ये आणले गेले. दुधाची पावडर हाच त्याचा आतापर्यंतचा आहार होता. ससून रुग्णालयातील मातृदूग्ध पेढीमुळे "त्याला' आज प्रथमच मातेचे दूध मिळाले.