MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 19 June 2018
रावेतमध्ये पुराचा धोका
पिंपरी - रावेतमध्ये पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्यात येतो. त्यामुळे नदीचा श्वास कोंडत आहे. नाल्यातही भराव टाकण्यात आला आहे. येथे टाकलेल्या भरावावर दुकानेही थाटली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर आल्यास अपघाताचा धोका संभवतो.

रासायनिक पदार्थांसाठी क्लस्टर उभारा
पुणे - ऑटो क्लस्टरच्या धर्तीवर रासायनिक पदार्थांसाठीही स्वतंत्र क्लस्टर उभारण्यास सरकारने पुण्यात जागा द्यावी, अशी मागणी पुणे केमिकल डीलर्स असोसिएशनने केली आहे. तसेच शहरात रासायनिक झोन निर्माण करून कायद्यातही सुसूत्रता आणावी, अशी मागणीही या संघटनेने केली.

‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या.

ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे
पिंपरी - काँक्रिट रस्ता जास्त काळ टिकतो, असे म्हणतात. मात्र, कासारवाडी ते एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे जाण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

कासारवाडी ते पिंपरी दरम्यानच्या कॉंक्रीट रस्त्याला तडे
ग्रेड सेपरेटर मधील कासारवाडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. काही ठिकाणी कॉंक्रीटचा रस्ताच उखडला असून रस्त्याचा समतोल बिघडला आहे. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

पिंपळे गुरव येथे योग सप्ताह संपन्न
नवी सांगवी (पुणे) - येथील ओम नमो: चिकित्सालय व ओम नमो: परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त नुकतेच मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील चिकित्सालयात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी योगासनांच्या प्रात्यक्षिकासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पितृ दिन साजरा करण्यात आला.

Subscribe to:
Posts (Atom)