MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 28 June 2018
नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75% रक्कम काढण्याची सुविधा
नवी दिल्ली – नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्याचा निर्णय सेवानिवृत्ती निधी संस्थेने (ईपीएफओ) जाहीर केला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील 75 टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित 25 टक्के रकमेसह आपले प्रॉव्हिडंट फंड खाते चालू ठेवण्याची सवलतही खातेदाराला देण्यात आलेली आहे.

प्राध्यापकांना कमी करता येणार नाही
'एआयसीटीई'ची इंजिनीअरिंग कॉलेजांना ताकीद
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात बदल
गेल्या एक महिन्यापासून विविध कामांमुळे बंद असलेल्या पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या वेळेतील लोकल सुरू होण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम एक ते २७ जुलै या कालावधीत सुरू केले जाणार असून, दुपारच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा
मुंबई (Pclive7.com):- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)