पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या चार महिन्यातील कारवाई; थर्माकोल बंदीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणार अधिक तीव्र
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 30 July 2018
सायकल शेअरिंगसाठी ४५ ठिकाणे
पिंपरी -स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात सायकल सुविधा योजना (बायसिकल शेअरिंग) राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यासह क्षेत्रीय पायाभूत सुविधा तत्त्वावर निश्चित केलेल्या ४५ ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी सायकल प्रायोजक कंपन्या आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

आयुक्तालयाची रचना निश्चित
पिंपरी : शहरात सुरू होत असलेल्या पोलिस आयुक्त कार्यालयाची अंतर्गत रचना निश्चित झाली आहे. नवनियुक्त आयुक्त हे पहिल्या मजल्यावर व नागरिकांशी संबधित सर्व विभाग हे तळमजल्यावर असणार आहेत. त्याचबरोबर अप्पर आयुक्त हे चिंचवड प्रेमलोकपार्क येथे असणाऱ्या आयुक्तालयात बसणार नसून, त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. सध्याचे उपायुक्त कार्यालय किंवा चिंचवडगावातील कामठे चौकातील इमारतीत त्यांचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
Police headquarters may be inaugurated after August 15
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad police commissionerat ..
पिंपरी शहरात घुमू लागला ढोल-ताशांचा दणदणाट
पिंपरी - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.

प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीसाठी ३२ पथके
पिंपरी - शहरात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे ३२ पथके स्थापन केली आहेत. संबंधित बंदीला अनुसरून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

31 हजार वृक्ष लागवड पुर्ण
– महापालिकेचे उद्दिष्ट्य पुर्ण होणार का?
पिंपरी – महापालिका हद्दीत यावर्षी 60 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. शहरात आत्तापर्यंत 31 हजार 419 वृक्ष लागवड करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)