MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 9 August 2018
पुलासाठी वर्षभराची प्रतीक्षा
पिंपरी - निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते किवळेतील मुकाई चौक या दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येत आहे. त्यासाठी रावेत येथील शिंदेवस्तीजवळ लोहमार्गावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलावर लोहमार्गाच्या ठिकाणी ८० मीटर लांबीच्या जागेत लोखंडी गर्डर बसविण्यात येणार आहे. त्याची तपासणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ८) केली. ८९० मीटर लांबीच्या या पुलाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल.

पहिल्या बैठकीत महापौरांचे ‘सारथी’कडे लक्ष: तक्रारी सोडविण्याच्या दिल्या सूचना
सारथी हेल्पलाईनवर येणा-या नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करतात. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेला सारथीला मागील तिन्ही आयुक्तांच्या कार्यकाळात दुय्यम स्थान मिळाले. दरम्यान, नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांनी सारथीकडे लक्ष दिले असून सारथीवरील तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत.
तिन्ही मेट्रोचे प्रवास भाडे समान
तुटीचा बोजा प्रवाशांवर नाही; वार्षिक ६०० कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता
शहरामध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी – पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका करण्यात येत आहेत. या तिन्ही मेट्रोचे प्रवासी भाडे समान ठेवण्यात येणार आहे. या प्रत्येक मार्गिकेला वार्षिक दोनशे कोटी रुपये एवढी तूट येण्याची शक्यता असली तरी त्याचा बोजा प्रवाशांवर टाकला जाणार नाही.

CETP plants' construction faces delay
Pimpri Chinchwad: The construction of a Common Effluent Trea ..
Subscribe to:
Posts (Atom)