पिंपरी – कचरा शहरांसाठी डोकेदुखी ठरत असताना घरच्या घरी अथवा सोसायट्यांमध्ये कचरा जिरवून इंधन, खत, वीज तयार करुन “कचऱ्याचे सोने’ कसे करायचे याचे दर्शन चिंचवड येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि. 17) सुरुवात झाली.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 18 August 2018
आयुक्तालयासाठी “तालेरा’चा निधी वर्ग
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाला स्वातंत्र्य दिनापासूनच सुवात झाली आहे. मात्र अद्याप आयुक्तालयाला हक्काची इमारत मिळालेली नाही. प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालय होत असून येथील विद्युत यंत्रणेसाठी 43 लाखांचा खर्च होणार आहे. निधीची चणचण असल्याने महापालिकेकडून तालेरा रुग्णालयाचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

सांगा आम्ही जगायचे कसे?
पिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे चालवायचे? चूल कशी पेटवायची, हा प्रश्न सफाई कामगार महिला पोटतिडकीने मांडत होत्या. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. त्यांचा ठेकेदार नक्की कोण, त्याचे नावही त्यांना सांगता येत नव्हते. त्यांच्या वेतनाची अडकलेली एकूण रकमेची बेरीज सुमारे एक कोटी रुपये होते.

नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी
कासारवाडीतील नाशिक फाटा चौक आणि परिसराला दुकानदारांनी गराडा घातला आहे. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्याने या कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असूनही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. परिणामी वाहनचालक वैतागले आहेत.

नुकताच तयार केलेला हिंजवडी-माण रस्ता खड्ड्यात !
दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करा; तालुका शिवसेनेचे प्रशासनास अल्टीमेटम
प्रेयसीच्या माफीसाठी पिंपरीत 300 बॅनर
पिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू झाल्यावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

जोड वृक्ष वेगळे करून पुन:रोपण सफल
पिंपरी – सध्या शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या मार्गिकेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांना छाटण्याऐवजी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने वृक्षांचे पुन: रोपण केले आहे. हे काम किती जरी क्लिष्ट असले तरी झाडे कापण्याऐवजी त्यांना मूळासकट काढून मेट्रो दुसऱ्या ठिकाणी लावत आहे. प्रत्यारोपणाच्या या कार्यात दोन झाडांसाठी मेट्रोच्या हॉर्टीकल्चर विभागास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. एकमेकांमध्ये गुंफलेल्या दोन झाडांना वेगळे करून मेट्रोने त्यांना पुन: रोपण केले.

Subscribe to:
Posts (Atom)