राहण्यायोग्य शहराच्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा क्रमांक तब्बल 69 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मात्र, शेजारच्या पुणे शहराने या सर्वेक्षणात क्रमांक एकचे स्थान मिळविले आहे. शहर पिछाडीवर पडण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असा खुलासा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.21) केला.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 22 August 2018
रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्या सुधारणा
पिंपरी – वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत या गाड्यांना मोठी गर्दी असते.
रोग एक, उपाय भलताच; पिंपरी महानगरपालिकेचा अजब कारभार
पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील त्यातही भोसरीत पालिकेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर भाजप सत्ताधारी महापालिकेने कारवाई केली नाही, तर त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांनी दिला आहे.


वर्षभरात प्राधिकरणाने 350 अतिक्रमणे हटवली
पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करून या वर्षात 350 अतिक्रमण हटवण्यात आली आहेत. प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून 32 हजार स्क्वेअर फूट क्षेत्र ताब्यात घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वर्षा पवार यांनी दिली.

Subscribe to:
Posts (Atom)