Monday, 22 October 2018

पालिका सभा कामकाजाच्या थेट प्रेक्षपणास मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे विनापरवाना थेट प्रेक्षपण केले जात असल्याबद्दल भाजपचे नगरसेवक बाबू नायर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून भाजपच्या नगरसेवकांमध्येच वाद निर्माण झाल्याने महापौर राहुल जाधव यांनी प्रथम थेट प्रेक्षपण बंद करण्याची सूचना केली. त्यानंतर लगेच आपला निर्णय फिरवत त्यांनी थेट प्रेक्षपणास हरकत नसल्याचे सांगत मंजुरी दिली. 

आयुक्‍तांच्या मंजुरीनंतर निगडीपर्यंत मेट्रोचा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंत मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहेत. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. डीपीआरचे सादरीकरणानंतर आयुक्तांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

पिंपरी रेल्वे स्टेशनचे पालटतेय रूप

पिंपरी - सातत्याने वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे शहरातील पिंपरी रेल्वे स्टेशनचा चेहरा बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 

बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले

पिंपरी – बांधकाम व्यावसायिकांनी सदनिधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फेत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार असल्याच्या नोटीस महापालिकेने भोसरी मतदार संघातील विकसकांना दिल्या आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

6 महिन्यांत 12 लाखांचा दंड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील सहा महिन्यात 12 लाख रुपयांचा दंड प्लास्टीक बंदीतून केला आहे. त्याद्वारे महापालिकेने 9 हजार 907 किलो प्लास्टीक गोळा केले आहे.

अभय योजने अंतर्गत 15 ऑक्टोबरपूर्वी 21.37 कोटीचा झाला भरणा

चार हजार मिळकतधारकांनी घेतला सवलीताचा लाभ
4 हजार मिळकत धारकांना पाच कोटींची सवलत

Inadequate water supply brings NCP, BJP together

Pimpri Chinchwad: Corporators from the Nationalist Congress  ..