Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Police Commissionerate has demanded more manpower and vehicles to carry out effective policing.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 19 December 2018
457th Moraya Gosavi festival from tomorrow
Pimpri Chinchwad: The 457th Moraya Gosavi Sanjeevan Samadhi ..
समाविष्ट भागातील नागरिकांसाठी ३०० एमएलडी पाणी उचलणार – आमदार महेश लांडगे
वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर आम्ही सर्वजण आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर, ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पण यापुढे असं होणार नसून प्रत्येक काम वेळच्या वेळी पूर्ण होईल. ज्या गोष्टींचा नागरिकांना त्रास होतो, त्या गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देऊ – आमदार महेश लांडगे
एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मानधनावर काम करणारे आणि ठेकेदारांकडे काम करणा-या सर्व विभागातील कंत्राटी आणि कर्मचा-यांना समान काम,समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन असे, आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात सांगितले.
पिंपळेगुरवला रंगणार अनोखे कवीसंमेलन
शब्दधन काव्यमंचच्यावतीने थंडीत कवितेचे उब देणारे अनोखे कवीसंमेलन पिंपळे गुरव येथे होणार आहे, अशी माहिती शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली. मस्त थंडी वाफाळलेला चहा आणि सोबत कविता यांची सुरेल मैफल गुरुवार (दि. 20 डिसेंबरला) सकाळी साडेसहा वाजता पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी होणार आहे.
महाराष्ट्र केसरीसाठी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 10 मल्लांची निवड
एमपीसी न्यूज – जालना येथे बुधवार (दि. 19) डिसेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेत महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन (भवानी तालीम)च्या दहा मल्लांची निवड झाली. ही निवड चाचणी काळेवाडी येथे शनिवारी (दि. 15) झाली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 1961 साली सुरु झाली.
औंध-बाणेर-बालेवाडीत पार्किंग धोरण राबविण्यासाठी स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ पर्याय
पुणे : महापालिकेचे प्रस्तावित पार्किंग धोरण अद्यापही कागदावर असले तरी या पार्किंग धोरणाला पूरक ठरेल असे स्मार्ट पाऊल पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) उचलले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी या भागात पे अॅण्ड पार्क योजना राबविताना मानवी हस्तक्षेप टाळून आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल असा पर्याय स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)