PIMPRI CHINCHWAD : The infrastructure for online connectivity ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 December 2018
चिखलीतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेस मिळाला मुहूर्त
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून, घरकुल प्रकल्पातील ४ सोसायटयांच्या इमारतीमधील एकूण १६८ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज (दि. २१) रोजी काढण्यात आली.
महिलेची सोनसाखळी हिसकावली
एमपीसी न्यूज – बस पकडताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरटयांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथे घडली. संजीवनी ज्ञानेश्वर देवकर (वय 54, रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘खेलो इंडिया युथ गेम्स’साठी महापालिकेने दिले 36 लाख रुपये
एमपीसी न्यूज – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत ‘खेलो इंडिया युथ गेम्स-2019 ‘ होणार आहेत. बालेवाडीत होणा-या या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पावणेछत्तीस लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.
पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर स्कूलच्या विद्यार्थ्यांची अनिकेत बालग्राम आश्रमास भेट
एमपीसी न्यूज – चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी आकुर्डी येथील अनिकेत बालग्राम या आश्रमास भेट दिली. विद्यार्थ्य़ांनी आश्रमातील विद्यार्थ्यांबरोबर आनंदात दिवस घालवला. तसेच येथील मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत भेटवस्तू देऊन आश्रमातील मुलांच्या आनंदात सहभागी होता आले. आश्रमातील मुलांबरोबर गप्पा तसेच त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ हा खूप मौल्यवान होता. हा अनुभव चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेता आला.
प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदेना निलंबित करा – शत्रुघ्न काटे
पिंपरी चिंचवड : महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘मी माहिती देऊ शकत नाही’, असे उध्दटपणे त्यांनी उत्तर दिले. अधिकार्यांना एवढी मस्ती कशाला हवी. असे म्हणत ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पाडली.
चिखलीच्या घरकूल प्रकल्पातील 168 सदनिकांची सोडत
पिंपरी चिंचवड : घरकुल प्रकल्पातील 4 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत अॅटो क्लस्टर, चिंचवड येथे महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी ही घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)