AFTER YEARS of neglecting the Pavana and Indrayani rivers passing through its jurisdiction, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are now seriously considering improving the status of these two rivers.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 February 2019
एच. ए. कंपनीच्या जागा विकत घेण्यास महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए) कंपनी सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल होत असून, त्यांचे पगारसुद्धा रखडलेले आहेत. यातून मार्ग काढणे जरुरीचे आहे. अन्यथा अनेक कामगारांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने एच. ए. कंपनीच्या जागांची खरेदी करण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 32 अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत; पोलीस अधिका-यांच्या नावाची यादी व्हायरल
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिका-यांपैकी 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत आहेत. याबाबतची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही यादी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.
‘अण्णासाहेब मगर स्टेडीयमचा तीस दिवसात ताबा द्या’
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमचा महिन्याभरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ताबा हस्तांतरित करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी केली आहे. तसेच ताबा न दिल्यास होणा-या कायदा आणि सुव्यवस्थेला महापालिका जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा; चार लाख 77 हजार मतदार
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील 73 लाख 69 हजार 141 मतदार मतदान करतील. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत दोन लाख एक हजार 480 नवीन मतदारांची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठरला असून चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली
Pimpri: शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रासह संयुक्तपणे सुधारीत करण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा तयार करत आहेत.
स्मार्ट सिटीवर पुण्याऐवजी आता पिंपरीचे पोलीस आयुक्त
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)