Saturday, 16 February 2019

रमाई आवास योजनेत 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी

पुणे – जिल्ह्यात रमाई आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत मातंग समाजासह अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गासाठी यंदाच्या वर्षात 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना हक्काचे घर मिळण्यास मदत झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कुटुंब पात्र आहेत आणि त्यांनी अजूनही अर्ज केला नाही, अशा कुटुंबांनी तालुक्‍यातील गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 24 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेसाठी व्यवस्थित नियोजन करण्याच्या सक्त सूचना राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना परीक्षा परिषदेकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आल्या आहेत.

महापालिका आणि शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजन्मोत्सव होणार साजरा

पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल पिंपरी-चिंचवड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव रवीवार (दि. १७ ते १९ फेब्रुवारी)  यादरम्यान सोहळ्याचे आयोजन केले आहे.

इंटरसिटी एक्सप्रेस दीड महिन्यासाठी रद्द

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड आणि कुर्डुवाडीदरम्यान घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’मुळे पुणे - सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (१२१६९) १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. इंटरसिटी एक्सप्रेस तबब्ल दीड महिना धावणार नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहे.

मतदार नोंदणीसाठीपुन्हा एकदा संधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दोन आणि तीन मार्च रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही मोहीम घेतली जाणार असल्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवडमधीलनियोजित कार्यक्रम रद्द

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदविला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.