एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड कन्नड महासंघाच्या वतीने पाचवा कन्नड स्नेह समारंभ आणि हास्य कलाकार गंगावती प्राणेश यांचा हास्य विनोदाचा कार्यक्रम होणार आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी (दि. 7) मार्चला सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 6 March 2019
पिंपळे निलख येथे आमदार जगताप यांच्या हस्ते मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन
पिंपरी (दि. ५ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथे मंगळवार (दि. ५) रोजी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गंत उभारण्यात येणा-या १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
भाजपने पिंपरी चिंचवड बेस्ट सिटीला कचरा सिटी बनविले – अजित पवार
भोसरी (दि. ५ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरीमधील गावजत्रा मैदानावर आज मंगळवार (दि. ५) रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात 10 वर्षांनंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ
पुणे – राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण आयोगाच्या खंडपीठाद्वारे पुण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दहा वर्षांनी खंडपीठ पुण्यात येणार आहे.
आझम कॅम्पसमधील न्यू लॉ ऍकॅडमीच्या तिसऱ्या मजल्यावर 11 ते 15 मार्चदरम्यान कामकाज चालणार आहे. 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा दावा असल्यास, राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करायचे असेल किंवा दावा इतरत्र बदली करायचा असेल, तर थेट दिल्ली येथील राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागावी लागते.
'शे काट्या' पक्षांचा मुक्काम चिंचवड परिसरात वाढला
लक्ष्मीनागर, चिंचवड - थंडीचा कालावधी वाढल्याने पवनेच्या पात्रालगत 'शे काट्या' पक्षांचा मुक्काम वाढला असुन त्यांचे थवे नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहेत.
शहरातील पदपथ कोणासाठी?
पिंपरी-चिंचवड शहर तुफान वेगाने वाढते आहे. एका सर्वेक्षणानुसार हा वेग सुमारे ७० टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्या होती ती आज २७ लाखांच्या दरम्यान आहे. नागरिकांचे सुदैव म्हणजे एक बेशिस्त वगळता या नगरीला अगदी कशाकशाचीही कमी नाही. मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, पूल, उड्डाण पूल, शाळा, दवाखाने, उद्याने, मंडई, मैदाने, जलतरण तलाव अशा सर्व सुखसुविधा आहेत.
भोसरीत विलास लांडेचा उत्साही कार्यकर्त्याकडून जयघोष, आवाज आला, तर तिकीटच कापतो; अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरला दम
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे पाहिजेत, ‘आमचा उमेदवार विलास लांडेच’ अशा घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना आज बेंबिच्या देठापासून ओरडतात. 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कुठे गेलतात? असा सवाल विचारत आता घोषणा दिल्यास तिकीटच कापतो, मला अजित पवार म्हणतात, असा सज्जड दम अजितदादांनी विलास लांडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
Subscribe to:
Posts (Atom)