बिल्डरने घातला उद्योजकाला 72 लाखांचा गंडा
हिंजवडी, 29 ऑगस्ट
एका गृहप्रकल्पात दहा सदनिकांची खरेदी करणा-या एका उद्योजकाला एका बांधकाम व्यावसायिकाने ऐनवेळी हा गृहप्रकल्प दुस-या बांधकाम व्यावसायिकाकडे हस्तांतरित करून सुमारे 72 लाख 37 हजारांचा गंडा घातला आहे. हा प्रकार थेरगाव येथील प्रकाश कन्स्ट्रक्शनमध्ये उघडकीस आला. संबधित बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने तेरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
No comments:
Post a Comment