पिंपरी, 15 ऑक्टोबर
चार दिवसांपूर्वी कारवाई करुनही पुन्हा अतिक्रमण केल्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आज निगडीतील संग्रामनगर मधील सुमारे 350 झोपड्या हटविल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या झोपडीवासियांनी त्रिवेणीनगर चौकात रास्तारोको केला. किरकोळ दगडफेकही केली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात पात्र करुन घेण्यात भेदभाव केल्याने रस्त्यावर येण्याची वेळ आल्याचा आरोप करत या झोपडीवासियांनी रस्त्यावरच संसार थाटला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment